भारतीय मजदूर संघाने केला परिचारिकांचा सन्मान.

43

 

माहूर प्रतिनिधी // पवन कोंडे

जागतीक परिचारिका दिनाचे औचित्य साधून भारतीय मजदूरसंघ संलग्न बांधकाम कामगार संघटना जिल्हा नांदेडच्या वतीने दि .12 मे रोजी वैद्यकीय अधीक्षक डॉ.व्यंकटेश भोसले यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या कार्यक्रमात माहूर येथील ग्रामीण रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान करून त्यांना सन्मानपत्र देण्यात आले.
आद्य परीचारीका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाला रीतसर सुरवात करण्यात आली.यावेळी युवक कॉंग्रेस वैद्यकीय आघाडी सेलचे राज्य समन्वयक डॉ. निरंजन केशवे, भाजपाचे शहराध्यक्ष गोपू महामुने, तानुबाई बिर्जे पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष जयकुमार अडकीने व डॉ.भोसले यांनी आपल्या मनोगतातून कोरोना महामारीच्या काळात जीवाची बाजी लावून निर्भयपणे व निष्ठापूर्वक सेवा देणाऱ्या परीचारीकांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी डॉ.अभिजीत अंबेकर,डॉ.सुषमा चौधरी,डॉ.सुप्रिया कदम,बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हा सचिव संजय सुरोशे,गुरु रविंदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष अॅड.नितेश बनसोडे,पत्रकार राज ठाकूर,मुख्य परीचारीका सुंदर बोथिंगे,राजकिरण देशमुख, परिचारिका एल.जि. मेंडके, एम.एस. कनाके,सि.एच मुधाळे, एल. एच. भिलावेकर, आर के. साबळे, के.बि. नमुलवार, पि.पि. नंद, एम.डी. येवले. पि.आर.कचकलवार, पि.बि. खरे, समुपदेशक किरण चिरडे यांचेसह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचलन पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष एस.एस. पाटील यांनी केले तर संजय सुरोशे यांनी आभार मानले.