आरमोरी तालुक्यातील वीज पडून मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबियांना आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते आर्थिक मदत !! आ.कृष्णा गजबे व तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांच्या उपस्थित ४ लक्ष रुपये चेक कुटूंबियांना सुपूर्द !!

255

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

आरमोरी :दि31जुलै-
१२ जुलै रोजी वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज पडून मृत पावलेल्या कुटूंबियांना त्यांच्या घरी जाऊन ४ लक्ष रु चेक आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते देण्यात आले..
इंजेवारी(पेट) येथील रामदास मडावी तर डोंगरसावंगी येथील यश गेनूदास राऊत यांचे १२ जुलै रोजी वीज पडून मृतृ झाली होती .
ही बातमी आ.कृष्णा गजबे यांना कळताच अगोदर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटूंबियांना सांत्वन केलं.. व लगेच शासन स्तरावर आर्थिक मदत मिळविण्यासाठी आरमोरी तहसीलदार साहेबाना संपर्क साधून घटनेची माहिती दिली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले. दोनी कुटूंबियांना ४ लक्ष रुपये चे चेक आर्थिक मदत म्हणून आ.कृष्णा गजबे यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी नंदुभाऊ पेट्टेवार भाजपा तालुकाध्यक्ष आरमोरी,सदानंद जी कुथे जिल्हा भाजपा महामंत्री,पासेवार उप सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आरमोरी,विवेक खेवले प स सदस्य, डॉ दुर्वेश जी भोयर ,खेमराज राऊत व गावातील मान्यवर उपस्थित होते.