अनावश्यक कारणाने फिरतांना आढळलेल्या पडोली येथील 47 नागरीकांची कोविड चाचणी – 06 पॉझीटिव्ह

164

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

सध्या झपाटयाने वाढत असलेला कोरोना विषाणु संसर्गाची साखळी तोडण्याचे उददेशाने सर्वत्र टाळेबंदी सुरु आहे. तरी सुध्दा काही इसम कोणत्याही सबळ कारणाशिवाय रस्त्यावर ‍फिरतांना ‍किंवा विनाकारण गाव गल्लीमध्ये बसून असतात व पोलीस गाडी दिसताच पळून जातात. त्यामुळे अशा बेशिस्त नागरीकांना धडा शिकविण्याकरीता आज दि. 11/05/2021 रोजी पडोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. मुरलीधर कासार यांनी विशेष मोहिम राबवून 47 नागरीकांना पो.स्टे.पडोली चे प्रांगणात आणून प्राथमिक स्वास्थ्य केंद्र ताडाळीचे चमु ला पाचारण करुन त्यांची कोविड-19 विषाणु बाबत अँटीजेन चाचणी करवून घेतली असता तब्बल 06 इसम पॉझी‍टिव्ह आढळले आहे. त्यांना आरोग्य विभागाच्या वतीने योग्य उपचाराकरीता विलगीकरण कक्षात रवाना करण्यात आले आहेत. अशा प्रकारची मोहिम यापुढे ही सुरु राहणार. त्यामुळे नागरीकांनी कोरोना विषाणू संसर्ग टाळण्याचे दृष्टीने विनाकारण बाहेर फिरणे टाळावे व स्वत:चे व कुटुंबीयांचे आरोग्याची काळजी घ्यावी असे नागरीकांना आवाहन पडोली पोलीसांचे वतीने करण्यात आले आहे.