ॲम्बुलन्स धारकाकडून होत असलेली कोविड रुग्णांची लूट थांबवा स्माईल फाउंडेशनचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

49

 

रोहन आदेवार
सहाय्यक जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

वणी: जिल्हाधिकारी कार्यालयाने ॲम्बुलन्स चे दर ठरवलेले असून देखील काही ॲम्बुलन्स चालक रुग्णांच्या नातेवाइकांकडून आर्थिक लूट करीत आहे. ही बाब अतिशय गंभीर आहेत आणि आधीच लोकांजवळ पैसे नाही आणि हॉस्पिटल मध्ये सुद्धा त्यांना भरपूर पैसे द्यावे लागत आहे व तसेच या माहामारीत त्यांना मोठ्या आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. आणि माहामारीच्या परिस्थितीतही ॲम्बुलन्स चे वाहन चालक जर लोकांची आर्थिक लूट करीत असेल तर लोकांनी जगावं की मरावं हा प्रश्न उपस्थित होतो.

आणि त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा कोणत्याही ॲम्बुलन्स चालकांनी जर जास्त पैसे घेतले तर आपण कार्यवाही करावी व याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे ही विनंती स्माईल फाउंडेशन चे अध्यक्ष सागर जाधव यांनी निवेदनातून उपविभागीय अधिकारी साहेब, वणी यांना केली.