चिमूर नगरपरिषद ला कायमस्वरूपी मुख्यधिकारी द्या .. पप्पू भाऊ शेख यांची मागणी मुख्याधिकारी नसल्याने नप चा कारभारात अनियमितता

84

 

प्रतिनिधी / शुभम पारखी

चिमूर क्रांतिकारी शहरातील नगर परिषद ला सतत प्रभारी मुख्याधिकारी मिळत असून प्रशासन मध्ये नेहमी अडचणी निर्माण होऊन जनतेला त्रास होत आहे परंतु सध्या च्या स्थितीत चिमूर नप ला मुख्याधिकारी कोणीच नसल्याने कोविड संकटात प्रशासन चालवीत असताना अनियमत्ता येत आहे नप चे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करण्याची मागणी युवक कांग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पप्पू शेख यांनी केली आहे

चिमूर नगर परिषद मध्ये मुख्याधिकारी नसल्याने चौगुले नामक अधिकाऱ्यावर भार असून ते सुद्धा कमकुवत ठरत आहे शहरात पाणी समस्या जटील होत आहे नाल्या उपसा कडे लक्ष दिले जात नाही कोरोना काळात जर दुकान वर दंड ठोकण्यासाठी कडक कारवाई करीत असले ते मात्र गर्दी च्या दारू अड्डया कडे लक्ष का नाही देत तसेच शहराच्या विकास कामे अजून थंड बसत्यात आहे पिण्याचे पाणी मिळण्यासाठी जनता त्रस्त होत आहे नाल्या उपसा होत नसल्याने मच्छर डास वाढत आहे कोरोना संकट काळात जनता भरडली जात असताना मात्र सामाजिक उपक्रम का सुरू करीत नाही
निववळ दंड वसूल करण्यात व्यस्त असल्याचे दिसते

चिमूर नगर परिषद ला कायम स्वरूपी मुख्याधिकारी द्यावा जेणेकरून शहराचा विकास होईल कोरोना संकट हाताळण्यासाठी मदत होईल यासाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी युवक कांग्रेस चे पप्पू शेख यांनी केली आहे….