देलनवाडी येथे उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करा- भामराज हर्षे यांची मागणी

114

 

देवानंद जांभुळकर जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

देलनवाडी :- येथे उन्हाळी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी देलनवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य भामराज हर्षे यांनी प्रशासनाकडे केली आहेत.

आरमोरी तालुक्यातील मोहझरी ,शिवनी खुर्द, मानापूर , नागरवाही ,कोसरी, मांगदा, देलनवादी येथील उन्हाळी हंगामातील धानाची कापणी व मळणीला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. शेतकऱ्यांनी उन्हाळी धान पीक नोंदीचे सातबारे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेच्या अंतर्गत ऑनलाइन केले परंतु अजून पर्यंत आदिवासी विविध कार्यकारी संस्थेने आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न केल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना खाजगी व्यापाराकडे कवडीमोल भावाने विकण्याची वेळ आली आहे .

देलनवाडी परिसरातील शेतकरी शेतीवर विहीर खोदून ,काहींनी जमिनीवर बोरवेल खोदून सिंचनाखाली जमिनी आणून उन्हाळी धान पीक घेतले आहे. आज घडीला देलनवाडी परिसरातील शेतातील धान्याची कापणी व मळणीस सुरुवात झाली आहे अनेक शेतकरी आधारभूत धान खरेदी केंद्र कधी सुरू होणार याचीच वाट बघत आहेत .परंतु मे महिना सुरू होऊनही आदिवासी कार्यकारी संस्था धान केंद्र सुरू न केल्याने देलनवाडी परिसरातील उन्हाळी धान पीक घेणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावी अशी मागणी भामराज हर्षे माजी ग्रामपंचायत सदस्य व शेतकऱ्यांनी केली आहे.