कोरोनाच्या नावाने हिंदू सनातन धर्मीयांना मासाहाराकडे वळवण्याचा आमदार संजय गायकवाड यांचा प्रयत्न

73

 

अकोट प्रतिनिधी

बुलढाणा मतदार संघातील आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी एका वृत्तपत्रामध्ये बेताल असं वक्तव्य केलेले आहे सदर लेखामध्ये त्यांनी लिहिलेले आहे की उपवास तपास करू नका मासाहार करा आणि कोरोना काळामध्ये देवाने दरवाजे बंद केले आहेत देवही तुमच्या मदतीला येणार नाही ही बातमी वृत्तपत्रांमध्ये येताच पूर्ण महाराष्ट्रात वारकरी मंडळी व्हाट्सअप फेसबुक वर शेअर करत आहेत आणि त्या बातमीमुळे सर्व वारकऱ्यांच्या आणि हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यासोबत विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश महाराज शेटे यांनी फोनवर चर्चा केली असता संजय गायकवाड यांचे म्हणणे आहे की मुस्लिम समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण जास्त आहे आणि म्हणून मुस्लिम समाजात कोरोना पॉझिटिव संख्या कमी आहे आणि हिंदू धर्मीयांमध्ये मासाहाराचे प्रमाण कमी आहे म्हणून कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या जास्त आहे त्यांना या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला सांगितली तर ते आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगतात त्यांना आम्ही म्हटले आपले बोलणे योग्य नाही यामुळे वारकऱ्यांच्या हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्या. तर संजय गायकवाड म्हणतात मला कुणाच्या भावनांचे घेणे देणे नाही मला लोकांचे प्राण वाचवायचे आहेत तुम्हाला कोणाला मानायचे असेल तर माना पण मी कोणाला मानत नाही. असेही ते म्हणाले आमदार संजय गायकवाड यांच्या बोलण्याचा सरळ अर्थ हा निघतो युगा युगाचा शाकाहारी असणारा हिंदू सनातन धर्म मासाहाराच्याकडे वळावा.कोरोना मुळे तुमचा जीव वाचवण्याची भीती दाखवून आमदार संजय गायकवाड हे मासाहाराकडे वळवण्याचा गोंडस प्रयत्न करत आहेत पण त्यांचा प्रयत्न वारकरी हाणून पडल्याशिवाय राहणार नाही. सदर केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार गायकवाड यांनी जाहीर माफी याकरिता आमदाराची फोनवर चर्चा केली असता ते म्हणतात मी माफी मागणार नाही चर्चा करायला तयार आहो तुम्ही म्हणाल तिथे मी येतो किंवा तुम्ही माझ्याकडे या पण लोक डाऊन च्या काळात घराच्या बाहेर निघणे ही शक्य नाही तर महाराष्ट्रातील कीर्तनकारांनी यांच्या भेटीला जावे तरी कसे आणि म्हणून आमदार संजय भाऊ गायकवाड यानी कोणत्याही प्रकारची पळवाट न काढता जाहीर माफी मागावी आणि जर चर्चा करायची असेल तर सर्व वारकरी संघटना तील प्रमुख किमान वीस कीर्तनकारांची गाडीची पास काढून घेऊन त्यांच्या वाहनाचा खर्च करून बुलढाण्याला बोलवावं आम्ही तिथेही चर्चा करायला तयार आहोत . कोरोना काळात वारकऱ्यांनी प्रशासनाला, सरकारला भरपूर सहकार्य केलेले आहे पण सरकारच्या आमदाराकडून अशा प्रकारच्या बेताल वक्तव्य ची अपेक्षा नसून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आपल्या आमदारांना थोडा समज द्यावा ही नम्र विनंती करण्यात येत आहे.