पहिल्याच मंगळवारी वैरागडात व्यापाराकडून कडकडीत बंद. – व्यापारी, शेतकरी, शेतमजूर यांचा पाठिंबा. – वैरागड पदाधिकारीकडून मोलाचे सहकार्य.

121

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. कोरोना लागनवर उपाय करण्यासाठी येथील ग्रामस्तरा मार्फत आठवड्यातील तीन मंगळवार किराणा दुकाने, भाजीपाला, अवैद्य धंदे, इतर दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेण्यात आला. अती आवश्यक औषधालय, सुरू राहतील असे सूचना करण्यात आले. यात पहिल्याच मंगळवारी येथील व्यापारांनी उत्फुर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळण्यात आले.
शासन-प्रशासन यांचे आदेशान्वये 15 मे पर्यंत शनिवार आणि रविवार या दिवशी सर्व व्यावसायिक दुकाने बंद राहतील तसेच सोमवार ते शुक्रवार यादिवशी सकाळी 11 वाजेपर्यंत जीवनश्यक दुकाने सुरू राहतील. वैरागड आणि परिसरात कोरोना लागण आणि मृत्युदर दिवसेदिवस वाढत आहे. यासाठी वैरागड ग्रामपंचायत स्तरावरून कोरोना महामारी आटोक्यात आणण्यासाठी तीन मंगळवार पाळण्याचे ठरविण्यात आले. दि. 10 मे रोजी मुणारी मार्फत गावात सूचना करण्यात आले. यावर गावातील व्यावसायिक, शेतकरी, शेत-मजूर आणि नागरिकांनी पाठिंबा देऊन कडकडीत गाव बंद ठेवले.
कोरोना महाबीमारीवर वैरागड गावात मात करण्यासाठी ग्रामस्तरावरून करण्यात येण्याऱ्या उपाय योजनेवर गावपातळीवर प्रसंशा करण्यात येत आहे. यात ग्रामपंचायत पदाधिकारी, तंटामुक्त समिती पदाधिकारी, तलाठी कार्यालय, आरोग्य विभाग, पोलीस पाटील,शिक्षण विभाग मोलाचे सहकार्य करीत आहेत.