करोनां काळात गोरगरिबान साठी देवदूत बनून अवतरल्या समाज सेविका सरिता मालू. त्यांचे सामाजिक कार्य खरोखर उलेखनिय.

173

प्रशांत चरडे,
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी,

कोरोना काळात संपूर्ण जगात हाहाकार माजला असताना प्रशासन ,आरोग्य यंत्रणा ह्या कोरोना चे निवारण करण्यासाठी सज्ज आहेत,परंतु रुगांची वाढती संख्या लक्षात घेता बऱ्याच ठिकाणी प्रशासनही हतबल झाल्या चे दिसून येत आहे .रुग्णाची हेळसांड होऊ नये व त्यांना योग्य तो उपचार मिळावा ह्या साठी प्रशासन अहोरात्र झटत आहे.
यातच गोरगरिबांना व प्रशासनाला मदत व्हावी व आपण समाजाचे देणेकरी आहों या उदात्त भावनेने अनेक सामाजिक संस्था व व्यक्ती देवदूत बनून रुग्णाची सेवा करीत आहे. असेच चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा फेंड्स चॅरिटी ग्रुप उल्लेखनीय असे सामाजिक कार्य करीत आहे.या सामाजिक संस्थेने करोना काळात अनेक गरजू रुग्णाची सेवा करीत आपला एक आदर्श समाजा पुढे ठेवला आहे. या कार्यात या संस्थेच्या अध्यक्षा सरिता मालू या तन, मन, धन तसेच अतिशय हिरीरीने भाग घेत आहेत .त्यांनी आज पर्यंत 20 ऑक्सिजन सिलेंडर, सात रूग्णांना प्लास्मा व सहा गरजू रूग्णांना बेड ची व्यवस्था करून देऊन खरी सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या ग्रुप चे काम समोर ही असेच निरंतर सुरु राहील व कोणत्याही प्रकारच्या मदतीकरिता आमच्या संस्थेशी संपर्क साधावा अशी माहिती ग्रुपच्या अध्यक्षा सरिता मालू ह्यांनी दिली आहे.