माहूरगडच्या पवित्र मातीचा मंगल कलश अयोध्येला रवाना.

162

 

माहूर (प्रतिनिधी पवन कोंडे)

प्रभू श्रीराम मंदिर निर्माण समितीने आवाहन केल्या नुसार श्री रेणुकादेवी संस्थानचे वतीने तेहतीस कोटी देवी देवतांचे माहेर घर असलेल्या व जगतगुरु भगवान श्री दत्त प्रभूंच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या भगवान परशूरामाच्या पवित्र भूमीतून (श्रीक्षेत्र माहूरगड ) मातीचा मंगल कलश दि.30 जुलै रोजी अयोध्येला रवाना करण्यात आला.
येत्या 5 ऑगस्टच्या शुभमुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते करोडो भक्तांची अपार श्रध्दा असलेल्या भगवान श्री प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिराच्या कामास प्रारंभ होणार आहे.त्याकरीता देशभरातील पवित्र ठिकाणची माती व अनेक नद्यांचे पाणी आणण्याचे आवाहन मंदिर निर्मिती समितीने केले होते.त्याला अनुसरून श्री रेणूकादेवी संस्थानचे विश्वस्त तथा मुख्य पूजारी चंद्रकांत भोपी यांचे हस्ते वेदमंत्राच्या घोषात विधियूक्त पूजन केलेला मातीचा मंगल कलश विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड प्रमुख चंद्रकांत रीठे यांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी तहसिलदार तथा कोषाध्यक्ष सिद्धेश्वर वरणगांवकर, विश्वस्त संजय कान्नव, विनायक फांदाडे, दुर्गादास भोपी, अरविंद देव, बालाजी जगत यांचेसह व्यवस्थापक योगेश साबळे यांची उपस्थिती होती.