मुंडगाव येथे लसीकरणासाठी नागरिकांची गर्दी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना पाचारण

56

 

अकोट प्रतिनिधी

अकोट तालुक्यातील मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दिनांक 11 मे मंगळवार रोजी covid-19 ची लस उपलब्ध झाली, असून ही लस घेण्यासाठी नागरिकांची अचानक गर्दी उसळली होती. कारण याआधी पाच ते सहा दिवसांपासून लसीचा तुटवडा निर्माण झाला होता. तसेच आज मंगळवार रोजी लस मुंडगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध झाली, असल्यामुळे नागरिकांनी लस घेण्यासाठी एकच गर्दी केली.तसेच हि गर्दी जास्त झाली होती म्हणून अकोट ग्रामीण पोलिसांना ही गर्दी रोखण्यासाठी बोलविण्यात आले होते. पोलिस आल्यानंतर ही गर्दी आटोक्‍यात आणण्यात आली होती.