लोटे परिसरात अद्ययावत अशा दोन कोविड सेंटर चे आ.भास्करराव जाधव यांच्या हस्ते उदघाटन संपन्न परमेश्वराचा आदेश मानून समाजसेवा करतो ज्या मातीत कमावतो तिथेच योगदान असले पाहिजे म्हणून कोविड सेंटरची निर्मिती : सतीश वाघ

58

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : आ.भास्करराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे लोटे पंचक्रोशीतील लोकांची गैरसोय दूर होणार आहे. आपण ज्या मातीत कमावतो तिथे आपले योगदान असले पाहिजे मी परमेश्वराचा आदेश मानून समाजसेवा करतो ज्या मातीत कमावतो तिथेच योगदान असले पाहिजे म्हणून लोटे परिसरात कोविड सेंटर व्हावे या संकल्पनेतून सुप्रिया लाईफसेन्स लिमिटेड च्या सीएसआर फंडातून सुमारे पन्नास लाख निधी देऊन आज येथे कोविड सेंटर चे लोकार्पण होत आहे .लोटे औद्योगिक वसाहत आणि परिसरातील मंडळी करीता लवकरच येथे शंभर बेड चे कायम स्वरूपी सुसज्ज असे सुंदर हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे अशी घोषणा सुप्रिया लाईफसेन्स लिमिटेड चे चेअरमन तथा कोकणातील सुप्रसिध्द उद्योगपती सतीश वाघ यांनी केली.
शिवसेना प्रवक्ते तथा गुहागर चे लोकप्रिय आमदार भास्करराव जाधव यांच्या हस्ते सोमवारी ११.३० वा घाणेखुंट येथे परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर ३० बेड चे आणि हॉटेल वक्रतुंड ३० बेड चे अशा दोन ठिकाणी कोविड सेंटरची उदघाटने झाली.तर उद्योगपती सतीश वाघ यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले ही कोविड सेंटर सुरू होण्यामध्ये असलेल्या अडचणी व त्रुटींवर जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासनाशी बोलून आ. जाधव यांनी मार्ग काढला आणि आज प्रत्यक्षात लोकांच्या सेवेत उपलब्ध झाली. ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सुसज्ज असलेल्या या कोविड सेंटरचा खूप मोठा उपयोग लोटे विभागातील रुग्णांना होणार आहे.आ.भास्करराव जाधव यांच्या विशेष प्रयत्नामुळे लोटे पंचक्रोशीतील लोकांची गैरसोय दूर होणार आहे
महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, पुणे संचलित परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, घाणेखुंट येथे लोटे औद्योगिक क्षेत्रातील सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे मालक श्री. सतीश वाघ यांनी सुमारे ५० लाख रुपये भरीव योगदान देऊन दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर उभी राहिली आहेत. तर हॉटेल वक्रतुंड येथे डॉ. परमेश्वर गौड यांच्या माध्यमातून सुसज्ज असे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. ही दोन्ही कोविड सेंटर प्रत्येकी ३० बेडची असून आज आ. जाधव यांच्या हस्ते उद्घाटन होऊन ती सुरू करण्यात आली.
परशुराम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये झालेल्या कार्यक्रमात आ. जाधव यांनी ही जागतिक महामारी असून प्रत्येकाने स्वतःसाठी जगण्यापेक्षा दुसऱ्यासाठी जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन केले. त्याचवेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. राजेंद्र आंब्रे यांनी बर्निंग हॉस्पिटलची केलेली मागणी योग्य असून त्यासाठीही पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी श्री. सतीश वाघ, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे संचालक शामसुंदर भाकरे, सुप्रिया लाईफसायन्स कंपनीचे श्री. वैद्य, खेड पंचायत समितीचे उपसभापती जीवन आंब्रे, प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने, जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापती सुनील मोरे, राजेंद्र आंब्रे, अरविंद चव्हाण, घाणेखुंटचे सरपंच अंकुश काते, लोटेचे सरपंच चंद्रकांत चाळके, मोहन आंब्रे, आल्हाद वरवाटकर ,आमदार जाधव यांचे स्वीय सहाय्यक संतोष तांदळे ,विशाल खेडेकर आदी उपस्थित होते.परशुराम हॉस्पिटल चे डॉ.शाम भाकरे यांनी हॉस्पिटल आणि कोविड सेंटर विषयी परिपूर्ण माहिती देऊन आमदार भास्करराव जाधव,सतीश वाघ यांचे विशेष आभार मानले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाकरे यांनी केले.

फोटो : कोविड सेंटर चे उदघाटन करतांना आ.भास्करराव जाधव,सतीश वाघ,डॉ.परमेश्वर गौड आणि मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत(छाया: ओंकार रेळेकर)

दखल न्यूज भारत