अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरपुर येथिल दुचाकीस्वार ठार, चारगाव – घुग्गुस मार्गावरील घटना

40

 

वणी : परशुराम पोटे

अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना चारगाव- घुग्गुस मार्गावरील शेलु गावाजवळ घडली आहे.
प्रदिप मारोती नागपुरे(२९)रा. शिरपुर असे मृतकाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे की, प्रदिप मारोती नागपुरे याचे दोन वर्षापुर्वी लग्न झाले असुन त्याला एक वर्षाची मुलगी आहे. तो मोल मजुरीचे (गवंडी)काम करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करित होता. दरम्यान सोमवारी दि.१० मे ला प्रदिप सकाळी पुनवट येथे कामाला गेला होता. दिवसभर काम करुन संध्याकाळी ६ वाजताचे दरम्यान प्रदिप हा पुनवट वरून आपल्या गावी शिरपुरकडे आपल्या दुचाकी क्र.एमएच-२९ एन-२३१० ने निघाला असता पुरड-शेलु गावाजवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका अज्ञात ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला धडक दिली, या अपघातात प्रदिप नागपुरे गंभिर जखमी झाला असता त्याला प्रथम वणी येथिल एका खाजगी रुग्णालयात दाखल केले होते परंतु प्रदिपची प्रकृती अधिक गंभीर असल्याने त्याला चंद्रपुर येथे हलविण्यास सांगितले. दरम्याण चंद्रपुर येथे नेत असतांना वाटेतच प्रदिपची प्राणजोत मालवली, दरम्याण मृत्युदेह वणीच्या ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आला असुन त्याच्या मृत्युदेहावर शवविच्छेदन करुन मृत्युदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या घटनेतील धडक देऊन पसार झालेले अज्ञात वाहन (ट्रॅक्टर) पुरड येथिल एका विटभट्टीवरील असल्याचे बोलले जात आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.