कोरोनामुळे अडगाव खुर्द येथील लक्ष्मीदेवी यात्रा मोहत्सव रद्द

109

 

अकोट शहर प्रतिनिधि
स्वप्नील सरकटे

राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून अकोट तालुक्यातही रुग्ण संख्या झपाट्याने वाढत जात आहे .कोरोना हा संसर्गजण्य रोग असल्यामुळे या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा. जिल्हाधिकारी अकोला यांच्या आदेशानुसार मंदिर परिसर बंद ठेवण्यात येणार असून २ ऑगस्ट रोजी होणारी श्री. लक्ष्मी देवी यात्रा रद्द करण्याचा निर्णय लक्ष्मी देवी विश्वस्त मंडळ व समस्त गावकऱ्यांनी विचारविनिमय करून एकमुखाने घेतला आहे.
२ ऑगस्ट रोजी यात्रा, आणि ३ ऑगस्ट रोजी दहीहंडी असा कार्यक्रम मंदिर समितीच्या वतीने अगोदर निर्धारित केला होता.परंतु अकोट तालुक्यात कोरोनाची वाढती रुग्ण संख्या बघता हा निर्णय विश्वस्त मंडळ यांनी चर्चेअंती मागे घेतला त्यामुळे अडगाव खुर्द येथे बाहेरगावा हून येणाऱ्या भाविकांनी मंदिर परिसरात येऊ नये, तसेच आपल्या राहत्या घरीच विधिवत पूजा करावी असे एका पत्रकाद्वारे विश्वस्त मंडळ अरबळी मंडळी अडगाव खुर्द यांनी कळविले आहे.