कोरोनामूळे मामाच्या गावाला यंदाही ” नो एन्ट्री ” मुलांच्या सुट्यातील मनोरंजन हिरावले

41

भिवापूर तालुका प्रतिनिधी नंददत्त डेकाटे 9421535724 भिवापूर:- लहान मुलांच्या विश्वाचे वर्णन करताना गीतकार ग. दि. माटगुळकर लिहितात झुक झुक झुक अगीन गाडी धुराच्या रेषा हवेत सोडी पळती झाडे पाहुया मामाच्या गावाला जाऊया. या बालगीतातुन लहान मुलांची निरागसता, नातेसंबंध, धमालीचे वर्णन कवीने कवितेत केले आहे दरवर्षी उन्हाळी सुट्ट्यांमध्ये लहान मुले मामाच्या गावाला जात असतात. परंतू परंतु मागील वर्षीपासून कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका असल्याने यंदाही मामाच्या गावाला ” नो एन्ट्री ” आहे. साधारणपणे एप्रिल व मे महिन्यात दरवर्षी परीक्षा होतात व वार्षिक परीक्षा संपल्यानंतर मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागतात. त्यानंतर मामाच्या गावाची ओढ, आपलेपणा मामाच्या गावाला जाऊन काय- काय करायची याचे चित्र रंगववाणी बालपणे कोरोनामूळे मामाच्या गावाला जाण्यापासून हिरमुसली आहेत. वर्षभरातील अभ्यासाचे ओझे दुर सारून सुट्टाचा मनमुराद आनंद लुटायचा आणि पुढील शैक्षणिक प्रक्रियेसाठी तयार व्हायचे, अनेक पिढ्यांनी हा आनंद लुटला परंतु कोरोनामूळे मामाच्या गावाला गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही ” नो एन्ट्री” असल्याने चिमुकल्यांना मामाच्या गावाची ओढकायम आहे. परंतु कोरोनामूळे अडचणी येत असून चिमुकल्यांच्या चेहर्‍यांवर नाराजगी दिसुन येत आहे.