३० फुट खोल विहीरीतील पाण्यात पडलेल्या इसमाला सुखरूप बाहेर काढून त्याचा प्राण वाचविला.

231

(चंद्रपूर जिल्हा)
भगवंत टि. पोपटे,
उपसंपादक-९२८४५८३८१३
दखल न्युज व दखल न्युज भारत

आज दिनांक ११/५/२०२१ ला दोन वाजताचे सुमारास सिद्धार्थ चौक, सिन्देवाही येथील निरूपयोगी ३० फुट खोल विहीरीमध्ये एक इसम तोल जाऊन पडलेला आहे, अशी माहिती पोलिस स्टेशनला मिळताच ताबडतोब पोलिस कर्मचारी जाऊन ऊपस्थित लोकांच्या सहकार्याने चारचाकी वाहनाचे टॉयरला दोर बांधून ३० फुट खोलीतून त्याला टायरचे साहाय्याने सूखरूप बाहेर काढले. आणी त्याचा प्राण वाचविला. विहीरीत पडलेल्या व्यक्तीचे नांव सुखदेव विठ्ठल महाडोरे वय ४७ वर्षे रा. सिन्देवाही असे आहे. त्याला विहीरीतून काढतांना उपस्थित लोकांसोबत पोलीस कर्मचारी रणधीर मदारे, गणेश मेश्राम आणी सतीश निनावे हे होते व त्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तामुळे पोलिस कर्मचारी कौतुकास पात्र ठरले आहेत.