लॉकडाउन काळात दहीहांडा पोलिसांचा माणुसकीचा धर्म पोलिस स्टेशन दहीहांडा ठाणेदार प्रकाश अहिरे यांनी शांत अभ्यासिका कुटासा येथे पुस्तके भेट

59

 

अकोट प्रतिनिधी

खाकी वर्दी मधील गैरसमज पोलिस त्यांची ओळख जनतेसमोर येते,मात्र त्या खाकी मध्ये सुधा कुठेतरी माणुसकीचा अंश असतोच त्यामध्येच पोलिस स्टेशन दहीहांडा सिंघम म्हणून त्यांची संपूर्ण परिसर मध्ये ओळख असलेले, नियमाचे कडक, अवैध धंदे वाल्यांचे धाबे दणानुन टाकणारे. आज पुन्हा एकदा खाकी मधील माणुसकीचा धर्म जोपासत कोरोणाच्या
दुष्काळसदृश परिस्थीतीमुळे ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा तयारी करणारे युवा तरुणावर मोठ्या प्रमाणावर आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. या परिस्थितीला तोंड देत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेतील टक्का हा वाढलेला आहे .बिकट परिस्थितीला तोंड देत मुले ‘अधिकारी व्हायचं ‘ हे स्वप्न उराशी बाळगून शहरांमध्ये येऊन अभ्यास करताना दिसतात. परंतु शहरात सर्वत्र कडेकोट बंदचे आदेश असल्यामुळे सर्व वाचनालय,शिकवणी वर्ग बंद आहेत.आपल्या गावी राहून अभ्यास करण्याकरिता स्पर्धा परिक्षेसाठी लागणाऱ्या पुस्तकांचा खर्च विद्यार्थ्यांना पेलावत नाही त्यामुळे त्यांना अभ्यास करण्याकरिता वाचनालय,पुस्तके,यापासून त्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून पोलिस स्टेशन दहीहांडा ठाणेदार प्रकाश अहिरे, पि.स.आय संभाजी हिवाळे,यांनी पोलिस स्टेशन मार्फत शांत अभ्यासिका कुटासा येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी करिता पुस्तके भेट देण्यात आली यावेळी विद्यार्थिनी आभार मानले.