Home महाराष्ट्र २ ऑगस्ट ला साधेपणाने साजरा होणार शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस

२ ऑगस्ट ला साधेपणाने साजरा होणार शेकापचा ७३ वा वर्धापन दिवस

149

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक

गडचिरोली: देशातील कारखानदार आणि भांडवलदार यांचे कॉग्रेस पक्षाचे असलेले वर्चस्व पाहता १५ ऑगस्टचे स्वातंत्र्य मिळाले तरीही देशातील शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर होणार नाही,त्यासाठी शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी, कामगारांच्या हक्कासाठी सरकार विरोधात लढावे लागणार असल्याचा ठाम निर्धार करुन २ ऑगस्ट १९४७ साली भारतीय शेतकरी कामगार पक्षाची स्थापना करण्यात आली.तेव्हापासून आजपर्यंत शेकाप हक्क आणि अधिकाराचा लढा सातत्याने रस्त्यावर आणि विधिमंडळात लढतो आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील डाव्या विचारांचे कार्यकर्ते या दिवशी एकत्र येवून जनसामान्यांना संवैधानिक न्याय मिळावा यासाठी विधिमंडळ आणि रस्त्यावरच्या लढ्याबद्दल विचारांची देवाणघेवाण करीत असत. मात्र यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भाव व लॉकडावून मुळे पक्षाचा लाल बावटा फडकवून साधेपणाने संपूर्ण राज्यात साजरा करावा, असे आवाहन पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांनी केले आहे.
त्यामुळे मच्छी मार्केट येथील गडचिरोली जिल्हा कार्यालयात पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सकाळी ११ वाजता साजरा करण्यात येणार आहे.
धानाला रुपये ३५००/- हमीभाव मिळाला पाहिजे.अन्यायकारक लॉकडावून मुळे रोजगार हिरावलेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना लॉकडावून काळात मासिक रुपये १०,०००/- ची मदत मिळाली पहिजे.अन्यायकारक लॉकडावून काळातील घरगुती व शेतीची वीज बीले माफ झाली पाहिजे. लॉकडावून मुळे मच्छीमार सोसायट्यांच्या झालेल्या नुकसानीपोटी सदर सोसायट्यांना हेक्टरी रुपये १ लाख प्रमाणे मदत मिळाली पाहिजे.गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना शेती आधारित व्यवसायाकरीता रुपये १० लाखांचे कर्ज कोणत्याही अटीशर्ती विना मिळण्यासाठी शासनाने शासन निर्णय घ्यावा या जनसामान्यांच्या प्रश्नांवर व्यापक आंदोलनात्मक जनसंघर्ष उभारण्याचा निर्धारही केला जाणार आहे.तसेच पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यावेळी फेसबुक लाईव्ह वरुन राज्य भरातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून कार्यकर्त्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेकापचे जिल्हा सह चिटणीस भाई रोहिदास कुमरे यांनी केले आहे.

Previous articleसागर खोब्रागडे यांनी वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
Next articleकोरोनामुळे अडगाव खुर्द येथील लक्ष्मीदेवी यात्रा मोहत्सव रद्द