वैरागड येथे तीन मंगळवार काटेकोरपणे पाळणी. – मुणारीद्वारे गावात सूचना. – कोरोना महामारीवर ग्रामस्तरावरून उपाय.

340

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – देशात आणि राज्यात कोरोना (कोविड-19) महामारीमुळे हाहाकार मजला असून वैरागड गाव आणि परिसरात कोरोना लागण तसेच मृत्युदर वाढत असल्याने गावात उपाय योजना म्हणून दि. 10 मे मंगळवार ते समोरील दोन मंगळवार असे तीन मंगळवार किराणा दुकाने, भाजीपाला, अवैद्य धंदे, औषध दुकान वगळून इतर सर्व दुकाने काटेकोरपणे बंद ठेऊन पाळण्याचे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे ग्रामस्तरावरून आज संध्याकाळी मुणारीद्वारे गावात सूचना देण्यात आले आहे.
शासन आणि प्रशासन यांचे कडून कोरोना आळाबंदी आणण्यासाठी सोमवार ते शुक्रवार सकाळी 11 वाजेपर्यंत जीवनाशक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश आहे. त्यानंतर शनिवार आणि रविवार या दिवशी औषधालाय दुकान वगळून बाकीचे दुकाने पुर्णपणे दिवसभर बंद आहे. वैरागड आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव तसेच मृत्यूदर दिवसेंदिवस वाढत असल्याने यावर प्रतिबंध म्हणून तीन मंगळवार संपूर्ण दुकाने बंद ठेऊन कोरोना बिमारीवर आळा आणण्याचा प्रयत्न ग्रामस्तरावरून केला जात आहे.
शासन, प्रशासन आणि ग्रामस्तरावरून कोरोना महामारी थांबवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. यात येथील व्यावसायिक आणि नारीक प्रतिसाद देत आहेत परंतु कोरोना काळात अशा बंदीमुळे व्यावसाईक आणि सामान्य नागरिक होळपळून जात आहे. त्यांच्या उदर-निर्वाह, रोजी-रोटी आणि कामकाजावर गंभीर परिणाम पडत आहे. कोरोना महामारी कधी संपेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.