दुर्गंधी पसरवणाऱ्या कंपन्यांना हद्दपार करू-संदिप फडकले यांचा इशारा

135

 

प्रतिनिधी : प्रफुल्ल रेळेकर.

खेड:-लोटे एमआयडीसी विस्तारीत टप्पात असगणी गावात आक्युआर फूड रेझिम प्रकल्पाला मनसे संदिप फडकले यांचा विरोध. ही कंपनीला गोव्यातुन हद्दपार केली होती आणि आता ही कंपनी असगणी गावाच्या बाजूला उभी करण्यात येत आहे.या कंपनीच्या बाजूला असगणी गाव ,वाड्या,मस्जिद आणि मंदिरे आहेत.रासायनिक प्रकल्प नको म्हणून असगणी गाव गेली २७ वर्ष संघर्ष करतआहे.सुमारे ६९० हेक्टर जमीन एमआयडीसी ने संपादित केलेली आहे.परंतु स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणारे कारखाने उभे करून देणार नाही. तसेच असगणी गावचे सरपंच, ग्रामपंचायतीला आक्युआर फूड रेझिम कंपनी माहिती देणार नसेल तर त्याचा माज ग्रामस्थांना सोबत घेऊन उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसे कामगार सरचिटणीस संदिप फडकले यांनी दिला आहे.असगणी ग्रामपंचायत सदस्य व नऊगाव शिस्टमंडळ लवकरात लवकर राज साहेबांची भेट घेणार असे संदिप फडकले म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांची भेट घेतली ते म्हणाले कोकणी जनता ही संयमी आणि शांत आहे याचा कोणीही वेगळा अर्थ काढण्याचा प्रयत्न करू नये.मनसे हा कारखाना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही असे वैभवजी खेडेकर म्हणाले.
दुर्गंधी कारखान्याला कोणी पाठिंबा देणार असेल तर त्यांना जनतेसमोर आणू असे फडकले बोलले. एचपीसीएल सारख्या कंपन्याना स्थानिकांनी हद्दपार केले.तसेच आक्युआर फूड रेझिम ला पण हद्दपार करणार असे रत्नागिरी जिल्हा कामगार सरचिटणीस संदिप फडकले म्हणाले.

दखल न्यूज भारत