मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून शेतकऱ्यांनी जाणून घेतले कंपोस्ट खताचे महत्व

0
76

 

प्रतिनिधी:रोहन आदेवार

वणी: मारोतराव वादाफळे कृषी महाविद्यालय यवतमाळ यांचा अभिनव उपक्रम विद्यार्थी शुभम रमेश पिंपळकर ने शेतकऱ्यांना सांगितली कंपोस्ट खताचे महत्व , विविध पद्धती व फायदे.
भारत देशात रासायनिक खताचे आगमन व त्यांचा वापर होण्यापूर्वी शेतकरी शेणखत , कंपोस्ट खत , गाळाचे खत , निरनिराळ्या घेहींचा वापर , पिकांची फेरपालट यांचेद्वारे जमिनीची सुपिकता टिकवून ठेवत असे कालांतराने शेतकरी रासायनिक खतांचा वापर प्रमाणापेक्षा जास्त करू लागले व व त्यात त्याचा दुष्परिणाम पिकावर तसेच जमिनीत दिसून येऊ लागलेत त्यामध्ये जमिनीची कसही कमी होत आहे अशा जमिनीची कस टिकवण्यासाठी सेंद्रिय पदार्थाचा जमिनीत वापर होणे आवश्यक आहे.
पिकावर होणारे दुष्परिणाम विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना समजावून सांगितली त्यावरील उपाय योजना कळविल्या कंपोस्ट खताचे विविध प्रकारही विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना सांगितले कंपोस्ट खत काढायची गरज आहे हा मुद्दा विद्यार्थिनीने शेतकऱ्यांना पटवून दिला.
सदर कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर ए ठाकरे व प्राध्यापिका पि आर चावरे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच कृषी सहाय्यक आर बी मडावी, गावातील फाल्गुन शामराव गोहोकार मिथुन धोटे अनिल वासेकर रवी वासेकर प्रमोद खुटेमाटे निलेश ताजने सतीश नगराळे प्रकाश ननकटे सुधीर कोंगरे महादेव कोल्हेकर कवडू मोहितकर नाथ्थू शिरसागर सदाशिव मोहितकर आशिष कोंगरे अविनाश भोयर गजानन मोहितकर अविनाश इटणकर विठ्ठल कोल्हेकर इत्यादी उपस्थित होते ग्रामस्थ उपस्थीत होते.