मूलाला पळऊन नेण्याचा प्रयत्न.. कारंजा येथिल घटना पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल..

166

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:—
कारंजा येथिल फिर्यादी अॅड. प्रिती सुरेश भोडणे,(नांदे) वय 35 वर्षे, व्यवसाय- वकील,
गणपती नगर,कारंजा लाड यांनी दि.
7 रोजी फिर्याद दाखल केली मी माझे पती नामे डाॅ.सुरेश भोडणे हे कारंजा लाड येथे एम.डी अॅनस्थीया असुन कारंजा शहरात वैद्यकीय व्यवसाय करतात मला दोन मुल असुन माझ्या मोठा मुलगा वंदन सुरेश भोडणे, (वय 12 )दि.03/05/2021 रोजी माझा मोठा मुलगा वंदन भोडणे हा सायंकाळी 05/30 वाजता मिञा सोबत क्रिकेट खेळण्यास गेला.परंतू तो अंधार पडला तरी घरी परत आला नाही.म्हणुन मी माझ्या मुलाचे मिञा कडे माझा मुलगा परत आला नाही. म्हणुन शहानीशा केली .असता त्याच्या मिञानी सांगीतले की,तुमचा मुलगा वंदन हा प्रशांत जाधव यांच्या मोटार सायकलवर गेला त्यानंतर मी व माझे पती सुरेश भोडणे असे मुलाचा शोध घेतला तर माझा मुलगा वंदण हा राञी 08/30 वा.घरी रडत रडत परत आला तो घाबरल्या सारखा दिसत असल्याने मी त्यास काय झाले अशी विचारणा केली असता त्याने सांगीतले की,मी गणपत नगरच्या खुल्या जागेत हजर असतांना तेथे कारंजा येथील पवन चव्हाण,रा.बायपास,कारंजा, कृष्णा राउत,रा.बायपाय,कारंजा, अभय बंड,रा.शिवाजी नगर,कारंजा हे आले व त्यांनी मला एकदम विचारले की,तु डाॅक्टरचा मुलगा आहे का तर मी त्यांना हो म्हटले तर या तिघांनी मला म्हटले की,तु ऊद्या पर्यंत एक लाख रुपये घेवुन ये नाही तर आम्ही तुला जिवाने मारून टाकु अशी धमकी दिली. व शिवीगाळ करुन ते तिघेही तिथुन निघुन गेल्या नंतर लगेच प्रशांत जाधव,रा.वनदेवी नगर,कारंजा हा मोटार सायकल घेवुन आला व मला म्हणाला की,त्या तिघाने तुला काय
म्हटले तर मी त्यांना काहीही सांगीतले नसल्याने प्रशांत जाधव याने मला त्याच्या मोटार सायकलवर बसवुन तुला घरी नेवुन सोडतो म्हणुन
गाडीवर बसवीले व मला माझ्या घरी न नेता मला पानझीरा रोडवर असलेल्या अर्धवट बांधकाम असलेल्या घरा जवळ घेवुन गेले. व तेथे वरील
तिघेही मुल त्या ठिकाणी आले व पवन चव्हाण ह्याने मला चाकु माझ्या पोटाला लावला व कृष्णा राउत ह्याने माझे केस पकडले व प्रशांत जाधव
ह्याने माझ्या गालात थापड मारली व म्हणाला की,उद्या एक लाख रुपये घेवुन ये नाहीतर तुला जिवाने मारुन टाकीन असे मुलाने मला संगीतले.
वरील आरोपीतांनी संगणमत करुन चाकुचा धाक दाखवुन एक लाख रुपये ची मागणी करुन न दिल्यास जिवाने मारुन टाकुन शिवीगाळ करुन
मुलास फुस लावुन मोटार सायकलवर घेवुन गेले.सदर घटनेच्या वेळेस काही मुले हजर होते.सदर फिर्यादी वरून आरोपी पवन चव्हाण,कृष्णा राऊत,अभय बंड,प्रशांत जाधव याच्या विरूद्ध भादवी कलम 386, 387, 363, 504, 506, 34 नूसार गून्हा दाखल केला आहे.पूढील तपास सूरू आहे..

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत