सिंधुदुर्गात कणकवली येथील उड्डाणपुलाचा काँक्रीट ओतत असताना काही भाग कोसळला

0
110

 

प्रतिनिधी निलेश आखाडे.

कणकवली – मुंबई गोवा महामार्गावर हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा पुन्हा एक नमुना कणकवलीत पाहायला मिळाला शुक्रवारी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमाराला हा प्रकार घडला उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. काँक्रीटचा लोड स्टील ने घेतला नसल्याने हे पूल कोसळले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे. मात्र जीवितहानी झाल्यावरच ठेकेदार सुधारणार का ? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
होत असलेले काम निकृष्ट दर्जाचे तरी होत नाही ना? मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत नागरिकांनी याआधीही तक्रारी केल्या आहेत. याबाबत संबंधित प्रशासनाने सदर घटनेची दखल घ्यावी व संबंधित कामाचा दर्जा तपासून पाहावा अशी मागणी स्थानिक करू लागले आहेत.

दखल न्यूज भारत