मोहझरी, शिवनी खुर्द,सुकाळा , वैरागड परिसरात तेंदुपाने संकलनास प्रारंभ

343

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

मोहझरी:- कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने देशात, राज्यात लोकडाऊन करण्यात आले. त्यामुळे रोजगार नसल्याने सर्व मजुरांचे काम बंद झाले होते आणि मजुरांवर व त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ येवून ठेपली. मात्र अशा परिस्थितीत तेंदूपत्ता हंगाम सुरू झाल्याने मोहझरी, शिवनी खुर्द, सुकाळा, परिसरातील मजुरांनी तेंदुपाने संकलन करून भाकरीचा प्रश्न सोडवला आहे.
आरमोरी तालुक्यातील वैरागड, मोहझरी, शिवनी खुर्द, सुकाळा परिसरातील बेरोजगार मजूर हे जोमाने जंगलातून तेंदुपत्ता गोळा करून राहिले आहेत. तेंदुपत्त्याच्या मिळालेल्या रकमेतून कुटुंबियांचे पालनपोषण सुरू आहे.
नागरीक प्रत्येक उन्हाळ्यात जंगलातील तेंदुपत्ता गोळा करून विक्री करतात. त्यामुळे त्यांना चांगली आर्थिक मिळकत मिळत असते.

संचारबंदीच्या काळात पोटाची खळगी भरणे हाच अनेकांसाठी मोठा प्रश्न निर्माण झाला. अशा परिस्थितीत तेंदुपत्ता हंगामाच्या स्वरूपात रोजगार मिळाल्याने काही काळासाठी नागरीकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.