ब्रह्मपुरी मार्गावर भाजीपाल्याच्या पिकॲपने सायकलस्वारांना उडविले घटनास्थळी एक ठार तर दुसरा गंभीर जखमी

223

 

हर्ष साखरे विभागीय प्रतिनिधी

ब्रम्हपुरी:- भाजीपाला भरून जात असणाऱ्या पिकॲपने सायकलस्वाराला चिरडल्या ची घटना घडली. आज सकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान भाजीपाल्याची पिकॲप MH 33 C 2481 या क्रमांकाची गाडी नागपूर वरून ब्रम्हपुरी मार्गाने चामोर्शीला भाजीपाला भरून जात होती.

विद्यानगर कडीजवळ एक जण आंबे विकण्यासाठी आपल्या साईकलने ब्रम्हपुरीला जात होता तर दुसरा शेतीच्या कामावर जात असलेल्या दोघांना पिकॲपवरील ड्रायव्हरच नियंत्रण सुटल्याने दोघांनाही जब्बर धडक दिली. त्यात आंबे विकायला जाणाऱ्याचा जागीच मृत्यू झाला व एक गंभीर जखमी असल्यामुळे त्याला उपजिल्हा रुग्णालय आरमोरी येथे उपचाराकरिता नेण्यात आले असता जखमींची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे गडचिरोली येथे हलविण्यात आले.

आंबे विकायला जाणार मृतकाचे नाव ललित श्रीराम चौधरी (वय 45) निलज येथील रहिवासी आहे. तर शेतीच्या कामावर जात असलेला जखमी इसमाचे नाव सदाशिव प्रधान रूई (वय वर्षे 50) असे आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले. पुढील तपास संबंधित पोलीस विभाग करीत आहे