कोरोना रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी तीन पक्षाचे सरकार असून सुद्धा अपयशी ठरले, नागरिकांन मध्ये चर्चेचा सूर. —–::रोगाच्या भीतीपोटी मृत्यूच्या आकड्यांमध्ये वाढ हजारो नागरिकांचा जीव धोक्यात::—–

161

 

निरा नरसिंहपुर दिनांक : ९ प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार,

महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोना रोगाने घातलेला धुमाकूळ सध्या महाभयंकर चालू आहे महा आघाडी सरकार अपयशी ठरले असा सवाल निरा नरसिंहपुर परिसरातील ग्रामस्थांच्या मधून चर्चेचा विषय होत आहे. हॉस्पिटल व दवाखान्याच्या माध्यमातुन गैरसोय झाल्याने रुग्णांना नंबर लावण्यासाठी वेटिंगला थांबावे लागत आहे. हजारो ग्रामस्थ लसीपासून वंचित ज्या   नागरिकांना लसीचा पहिला  डोस घेतला त्या नागरिकांना दुसरा ४५ दिवसा नंतर दिली जाणारी लस घ्यावी लागत आहे.

हजारो नागरिक लसी पासून वंचित केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 18 वर्षे वयातील पुढील नागरिकांना देखील लसीचा  पत्ता नाही. जो कोरोना बाधित पेशंट असेल व्हेंटिलेटरचा गॅस तातडीने उपलब्ध न झाल्यामुळे मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. ज्या पेशंटला रेमेडीशेअर इंजेक्शनची गरज आहे त्यांना पण इंजेक्शन मिळेना असे महाभयंकर संकट कोसळल्या मुळे अनेक लोक मृत्युमुखी पडलेले असून मृत्यूशी काही नागरिक झुंज देत आहेत. सर्रास सर्व नागरिकांना महाभयंकर या रोगाचा ताप सहन करावा लागतो आहे. शेवटी सहन न झाल्याने भीतीपोटी जीव गमवावा लागतो कोरोणा रोगाच्या देखभाली पासून सुद्धा अनेक डॉक्टर लोकांना त्याची लागण झालेली आहे . डॉक्टर आपल्या स्वतःचा जीव धोक्यात ठेवून पेशंटवर उपाय करत असतात तरी देखील डॉक्टरांसाठी लागणारे रेडमिशन इंजेक्शन याचा तुटवडा आहे. गरज असून सुद्धा न मिळाल्यामुळे डॉक्टरन पुढे अडचणीचा प्रश्न निर्माण झाला आहे. असा सवाल  या परिसरातील पेशंट व ग्रामस्थांकडून येत आहे. कोवीड वार्डात ऑक्सिजन साठी रांगा, लॉक डाऊन मध्ये जेवण्यासाठी रांगा, हॉस्पिटलमध्ये अंबुलसच्या रांगा, ऑक्सिजन मध्ये बेड साठी रांगा, स्मशान भूमी मध्ये चित्ते साठी वेटिंगच्या रंगा, बँकेमध्ये पैसे घेण्यासाठी रांगा, शेतकऱ्याच्या धान्याच्या खरेदी-विक्रीचा बाजार बंद, जनावरे पशु पक्षाचा बाजार बंद, बारा बलुतेदारांचा संपूर्ण व्यवसाय बंद, मंडप ठेकेदार व्यवसाय, हॉटेल, आचारी, वडापाव धारक, हेअर सलून, वरातीचा घोडा, वाजंत्री तमाशा फड मालक, लग्न कार्यालय, या सर्वच व्यवसायावर कोरोना महामारीचे संकट झाल्यामुळे जीवन जगणे मुश्कील आहे. असा मोठा प्रश्न सर्वसामान्यांना निर्माण झाला आहे. यासाठी राज्य सरकारने ज्या त्या व्यवसाय धारकांना जीवन जगण्यासाठी मदतीचा हात द्यावा अशी ग्रामस्थांकडून व व्‍यवसाय धारक यांच्याकडून मागणी होत आहे. आजाराच्या संकटामुळे नागरिकांचा जीव धोक्यात असल्याने मोठे संकट समोर उभे आहे.

————————————————–

फोटो:- ओळी- कोरोनाच्या संकटामुळे नागरिकांना त्रास होत असताना छायाचित्र

Balasaheb Sutar
Reporter
Mob.9850628160