बैद्यनाथ चौकातील एटिएम फोडणारे गजाआड इमामवाडा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

115

 

आशिष भगवान थूल (९८३४७१८२६८)
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत नागपूर

नागपूर :- ३१ जूलै २०२०
शहराच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बैद्यनाथ चौक येथील ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.आरोपींची नावे रोहित उर्फ काल्या विक्की खोब्रागडे (वय १९ ), विशाल उर्फ जट्या अशोक कुंभरे (वय ३२) आणि महेश राजेंद्र चूटे (वय २५) सर्व राहणार रामबाग नागपूर आहेत.
घटनेचे सविस्तर माहिती अशी की, आरोपींनी २५ जूलै च्या मध्यरात्री बैद्यनाथ चौकातील एक्सिस बॅंकेचे एटीएम फोडून त्यामधिल रोख रक्कम चोरण्याचा प्रयत्न करताना एटिएम मशिनची तोडफोड करण्याचा प्रयत्न केला परंतु ते अपयशी ठरले. ती मशीन तेथेच सोडून चोरटे तेथून पसार झाले.हा सगळा प्रकार तेथे असलेल्या सिसिटिवी कॅमेर्यात कैद झाला.सकाळी हि घटना बॅंक कर्मचार्यांच्या लक्षात येताच त्यांनी लागलिच इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून घडलेल्या प्रकाराची चौकशी सुरू केली आणि तेथील सिसिटिवी चे फुटेज ताब्यात घेतले.सिसिटिवी फुटेज चे निरिक्षण करत असतानाच आरोपी जवळच्याच परिसरातील असल्याचे पोलिसांना समजले.पोलिसांनी वेळ न गमावता गूप्तहेरांच्या मदतीने आरोपिंना अटक करून त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि घडलेल्या घटनेचा चार दिवसांत छडा लावला.यामूळे इमामवाडा पोलिसांचे सर्वत्र कौतूक केले जात आहे.