कोरोना ( टाळेबंदी ) मुळे दुरावलेले नातलग भ्रमणध्वनीने जवळ गुंफून ठेवले .

93

 

अकोट प्रतिनिधी

कोव्हिड – १९ हा संसर्गजन्य आजार, गेल्या वर्षीच्या, २२मार्च २०२१रोजी भारतात सुरु झाला . आणि शासनाने, संचारबंदी सुरु केली . त्यामुळे देश – विदेशात वास्तव्यास असलेल्या नातलगाचे एकमेकांच्या घरी जाणे, मुलीचे माहेरी जाणे , जावयाचे सासर वाडीस जाणे तद्वतच, नोकरदारांचे स्वतःचे मुळ गावी जाणे, मित्रांचे मित्र परिवाराला भेटणे . आज जवळ जवळ चौदा महिन्यांपासून बंद झाले. त्यामुळे नातलग एकमेकांपासून, विवाहिता आई – वडीलांपासून , कृष्ण सुदामा सारखे जीवलग मित्र एकमेकांपासून दुरावल्या गेले .परंतु तरीही त्यांना एकमेकांमध्ये गुंफून ठेवण्याचे काम, केवळ मानव निर्मित, विज्ञान – तंत्रज्ञानामुळेच शक्य झाले असल्याचे समाजसेवक अमण गवई हे सांगतात . त्याबदल सविस्तर असे की, आज तंत्रज्ञानाने विकसीत असलेला भ्रमण ध्वनी असल्यामुळे, आपण एकमेकांना अगदी समोरा समोर बघू शकतो . एकमेकांचे मार्गदर्शन, सल्ला, विचार घेऊ शकतो . ऑन लाईन राहून एकमेकांच्या सुखं दुःखात सहभागी होऊ शकतो .आपली छोटी छोटी मुले त्यांचा शालेय अभ्यास व गृहपाठ करू शकतात . नवनविन घडामोडी, बातम्या, औषधोपचार घेऊ शकतो . ही ” भ्रमण ध्वनी ” ही विज्ञानाने दिलेली खूप मोठी उपलब्धी असून, कोरोना महासंकटात आनंदी जीवन जगण्याचे महत्वपूर्ण साधन झाले आहे . असे समाजसेवक अमण गवई यांनी म्हटले आहे .