तेंदूपत्ता तोडणी करताना मजुरांनी विशेष काळजी घ्यावी … ” वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांचे आव्हान.

79

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – महाराष्ट्र,छत्तीसगड , मध्यप्रदेश या राज्यात मोठ्या प्रमाणात तेंदुपत्ता संकलन करण्याचा प्रमुख व्यवसाय समजला जातो त्यातील महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा जगलव्याप्त वनवैभवाने संपन्न असलेला जिल्हा म्हणून परिचित आहे. याठिकाणी मोठ्याप्रमाणात तेंदूपत्ता तोडणी करून संकलन केले जाते.या जिल्ह्यातील आदिवासी समाजाचा प्रमुख व्यवसाय समजला जातो.एप्रिल ते मे या दोन महिन्यांमध्ये तेंदूपत्ता हंगामाला जोमाने सुरुवात झाली असून आज आरमोरी तालु्यातील वैरागड आणि सालमारा येथील तेंदूपत्ता मजूर हे सकाळी तेंदुपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात गेले असता त्यांच्यावर अस्वलाने आणि रानटी डुक्कर यांनीं हल्ला केला त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासठी आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्याची स्थिती नाजूक असल्याचे समजते..तेंदुपत्ता संकलन करताना नेहमी मानव आणि प्राणी यातील संघर्ष पहावयास मिळतो आणि या संघर्षात मानव किवा प्राणी यांना नाहक आपले प्राण गमवावे लागते तेंदुपत्ता गोळा करताना जंगलातील वन्यजीव साप,अस्वल,वाघ यापासून जीवितहानी होण्याची दाटशक्यता असल्याने तेंदूपत्ता ठेकेदाराने शासनाने नमूद केलेल्या अटी व शर्थीचे पालन करून तेंदुपत्ता मजुरांचे सरक्षण व्हावे यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे.उन्हाळा असल्याने वन्यजीव पिण्याच्या पाण्याच्या शोधाकरीता भटकंती करीत असतात अशात काही प्राणी थंडठिकाणी तर काही झुडपाचा आधार घेऊन आराम करीत असतात.आपल्याला त्यांची कल्पना नसल्याने बिनधास्त झुडपात पाने तोडायला जातो अशावेळेस अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच गावापासून 10 ते 15 किलोमिटर अंतरावर जंगलात असल्याने वेळीच उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागतो.अशावेळी त्यांना झालेल्या अपघातावर वेळीच प्राथमिक उपचार कीवा त्याविषयीची माहिती असल्यास त्यांना दवाखान्यात येईपर्यंत वेळ मिळेल तसेच त्यांना आपले प्राण वाचविता येईल याकरिता वन्यजीव,जंगल,वणवे याविषयी वनविभाग यांनी जनजागरण करण्याची मोहीम राबविली पाहिजे तसेच वाघाच्या हल्ल्यात जखमी किवा मृत पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते तशी इतरही प्राण्याच्या बाबतीत मदत मिळावी अशी मागणी “वृक्षवल्ली वन्यजीव सरक्षण संस्था, आरमोरीच्या पदाधिकाऱ्याने केली आहे……..