खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल विद्यालयाचा दहावी चा निकाल 100 टक्के

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : तालुक्यातील गोवळकोट येथील गोवळकोट एज्युकेशन सोसायटी संचलित, खदीजा इंग्लिश मीडियम स्कूल व खातून अब्दुल्लाह सेकंडरी स्कूल या विद्यालय चा निकाल १०० टक्के लागला आहे.विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी.मनाल समीर दळवी हिने ९४.४० टक्के गुण घेऊन विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकाविला.
विद्यालयातून एकूण ५३ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत.प्रथम क्रमांक कु.मनाल समीर दळवी ९४.४० टक्के,द्वितीय क्रमांक कु.अस्मा मोतसिम बक्षी ९३टक्के, तृतीय क्रमांक कु.उमामा कमालूद्दीन हमदूले ९०.४ टक्के, या विद्यार्थ्यांने प्राप्त केला. विद्यालयमध्ये एकूण विद्यार्थ्यांपैकी २२ विद्यार्थी विशेष प्राविण्य प्राप्त, तर प्रथम श्रेणीत २२विद्यार्थी, आणि द्वितीय श्रेणीत ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सर्वच विषयांचा शंभर टक्केनिकाल लागला असल्यामुळे गोवळकोट परिसरांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे.व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या यशाबद्दल गोवळकोट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. उमर मुकादम, संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अजमल पटेल संस्थेचे विद्यमान चेअरमन श्री. डॉ. इसहाक खतीब, व्हा.चेअरमन श्री. जफर कटमाले, सेक्रेटरी श्री. मुजाहिद मेयर, खजिनदार अब्बास चौगुले, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ.उरुसा खतीब, विद्यालायचे मुख्याध्यापक श्री.खुर्शीद शेख तसेच संस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी, विद्यालायचे सर्व मार्गदर्शक शिक्षक, व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

दखल न्यूज भारत