कोनसरी येथे जंगली डुकराची शिकार सहा आरोपींना केले वनविभागाने जेरबंद

1134

 

उपसंपादक// अशोक खंडारे

दिनांक ०८/०५/२०२१ रोजी मार्कंडा वनपरिक्षेत्र अंतर्गत जंगली डुक्कर शिकार करून विक्री करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी एस.एम. निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोनसरी क्षेत्र सहाय्यक व सर्व इतर वनकर्मचारी घटनास्थळी पोहोचले पाहणी करून आरोपींचा शोध घेतला असता नामे अंबरीश आनंद मंडल रा. बहादुरपुर, चंद्रजीत चिता मंडल रा. बहादुरपुर, संदीप भैयाजी गुरनुले रा. कोनसरी, करण संजय गुरनुले रा. कोनसरी, आकाश राजु कावडे रा. कोनसरी, बबलू चित्रांजन वैद्य रा . बहादूरपुर हे ६ इसम आढळून आले. सदर घटनेची चौकशी करण्याकरिता त्यांना ताब्यात घेतले असता त्यांनी शिकार करून विक्री करण्याची कबुली दिली.
त्यांच्याविरुद्ध गुन्हा क्रमांक ०८१५७/२०३९०१ दिनांक ०८/०५/२०२१ नुसार वनगुन्हा दर्ज करून कलम – वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,३९,४४,४८ (A) ५०, व ५१ अन्वये कारवाई करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर घटनेचा पुढील तपास उपवनरक्षक सी आर तांबे आलापल्ली सहायक वनसंरक्षक ( तेंदू ) एस पी पवार आलापल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली एस. एम. निर्मळ, वन परिक्षेत्र अधिकारी मार्कंडा (क) यांच्या नेतृत्वात एस. खापरे, आर. पी. ठाकरे, आर. दनडीकवार, एस हजारे, एस. सडमेक, जे. गोवर्धन, एम. कोकणारे, व्ही.आगरे,पी.मेश्राम इत्यादी कर्मचारी पुढील तपास करीत आहेत.