अखेर कुनघाडा येथील मुख्याध्यापक पी.पी.आचेवार निलंबित

2137

उपसंपादक /अशोक खंडारे

चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (माल)येथील जि.प.उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक पी.पी.आचेवार यांनी प्रभारी केंद्रप्रमुख सी.सी.गोटपर्तीवार यांना व्हाट्सअपवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणी केंद्रप्रमुख गोटपर्तीवार यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प.यांचेकडे तक्रार केली होती. या प्रकरणी चौकशी दरम्यान मुख्याध्यापक पी.पी.आचेवार हे दोषी आढळल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरनाची सखोल चौकशी चामोर्शी चे गटशिक्षणाधिकारी यांनी केली असता पी.पी.आचेवर हे दोषी आढळून आले.त्यांचे वर्तन शिक्षकी पेशाला काळिमा फासणारे अशोभनीय असे कृत्य असून त्यांनी नियत कर्त्याव्यात कसूर केल्याची बाब निदर्शनास येते.त्यामुळे जि.प.जिल्हासेवा (वर्तणूक)नियम १९६७ मधील नियम ३चा भंग केलेला आहे. त्यामुळे पी.पी.आचेवार, मुख्याध्यापक जि.प.उच्च प्राथमिक शाळा ,कुनघाडा (माल) यांना तात्काळ निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.यांनी निर्गमित केला आहे. या निलंबन कालावधीत त्यांना मुख्यालय पंचायत समिती ,सिरोंचा देण्यात आले आहे.