दर्यापुर तालुक्यातील होमगार्ड वेतनाच्या प्रतीक्षेत गेल्या सहा महिन्यापासून पगार विना देत आहेत सेवा

187

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

दर्यापूर तालुक्यात पोलीस जवानांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या गृहरक्षक दलाच्या होमगार्ड जवानांना गेल्या सहा महिन्यांपासून वेतन मिळाले नाही त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे ऑनड्युटी होमगार्ड उपाशी अशी त्यांची अवस्था झाली आहे शासनाने याचा गांभीर्याने विचार करून होमगार्डचे थकलेले वेतन तातडीने जमा करावे अशी मागणी गृहरक्षक दलाच्या जवानांनी केली आहे त्यांच्या मुलांना शिक्षण आरोग्य सेवा सुविधा पुरवण्यासाठी होमगार्ड पगार बिल न मिळाल्यामुळे सेवा पुरवू शकत नाही सध्या होमगार्ड जवानांना अत्यंत कमी वेतन दिले जाते दिवसाला 670 रुपये मानधन दिले जाते परंतु वर्षाचे बारा महिने काम मिळेल याची अजिबात खात्री नसते त्यामुळे होमगार्ड ही नोकरी करून उत्पन्नाचे पर्याय व साधन शोधत असतात त्यामध्ये बरेचसे होमगार्ड आपला व्यवसाय झाल्यानंतर पर्यायी व्यवसाय शोधण्याच्या शोधात असतात सण-उत्सव परीक्षा कालावधीत पोलिस दलाला सहाय्य करणाऱ्या गृहरक्षक दलाच्या जवानांचे अर्थात होमगार्डचे पाच ते सहा महिन्यांपासून वेतन रखडलेले आहे त्यांचे हाल मोठ्या प्रमाणावर ती झाले असल्याचे दिसून येत आहे नोव्हेंबर महिन्यापासून वेतन मिळाले नसल्याने अनेकांची उपासमार सुरू आहे जिल्ह्यातील विविध सण उत्सव मध्ये दिवस-रात्र पोलिसाच्या खांद्याला खांदा लावून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जबाबदारी होमगार्ड पार पाडत असतात महिला आणि पुरुष होमगार्ड ची भरती प्रक्रिया करण्यात आल्यानंतर पोलिस दलासोबतच त्यांनाही वेळोवेळी कर्तव्यावर पाठवले जाते या त्याचा योग्य मोबदला वेतन कधी मिळणार याची माहिती नसताना दुसरीकडे सहा महिने होमगार्ड ची ड्युटी आणि उर्वरित वेळ इतर कामांना द्यावा लागत आहे त्यामुळे होमगार्ड याचे हाल होत आहेत पोलीस दलाने याकडे विशेष लक्ष व पाठपुरावा करण्याची मागणी तालुक्यातील होमगार्ड यांनी केली आहे पोलिसांच्या खालोखाल त्यांना दर्जा दिला जात असताना सुद्धा वेतन होण्यासाठी ताटकळत का ठेवत आहेत असा संतप्त सवाल होमगार्ड यांनी केला आहे ऊन वारा पाऊस सण उत्सव समारंभ मोर्चा दंगल वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता बस स्टॉप इतर चौकाचौकात त्यांना दिवस रात्र खडा पहारा द्यावा लागत आहे तरीसुद्धा या सर्व गंभीर प्रश्नांची शासन प्रशासन स्तरावर दखल घेऊन त्यांना वेतन लवकरात लवकर अदा करण्यात यावे अशी मागणी तालुक्यातील होमगार्ड नी केली आहे आपल्या प्रतिक्रिया देण्यासाठी होमगार्ड समोर येत नाहीत समोर आल्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपल्याला आपल्या सेवेतून कमी करतील अशी भीती त्याच्यात निर्माण झाली आहे त्यामुळे होमगार्ड इच्छा व्यक्त करीत नाहीत होमगार्डला मानधनात जर वेळेवर मिळाले नाही तर त्यांनी त्यांची उपजीविका कशी भागवावी तसेच मुलांच्या शाळा घर खर्च दैनंदिन खर्च यासाठी उधार उसनवार करत अनेक दिवस काढत आहेत मात्र तरीही त्यांची मानधन वेळेवर मिळत नाही होमगार्डना भविष्य निर्वाह निधी प्रॉव्हिडंट फंड राज्य कामगार विमा योजना एसआय गट आदी योजना लागू करण्याची गरज दिसत आहे त्यामुळे तालुक्यातील होमगार्ड चिंतातुर झाले असल्याचे दिसून येत आहे.