अभिनव बहुउद्देशीय कला मंच गडचिरोलीच्या वतीने गरजूंना राशन किट वाटप

110

 

ऋषी सहारे
संपादक

गडचिरोली दि 9मे
आज दि.९/५/२०२१ ला डि.एम.खोले, सेवानिवृत्त जिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड, पुणे यांचे आर्थिक सहकार्याने आणि अभिनव बहुद्देशीय कला मंच गडचिरोली यांचे वतीने गडचिरोली शहरातील बस स्टॅण्ड, महिला महाविद्यालय, मुरखळा परिसरात पाल टाकून राहणा-या गरीब, गरजू लोकांच्या कुटूंबांना लाॅकडाऊन मध्ये तांदूळ,पिठ,साखर,पत्ती, मिरची पावडर, हळद पावडर, मसाला पावडर,रिफाईन्ड तेल,साबण,दाळ ( राशन किट) तयार करून संस्थेचे सचिव- अकिल शेख, उपाध्यक्ष- गिरीश मुंजमकर, सहसचिव- प्रकाश मोहीतकर, सदस्य- अॅड.विजय म्हशाखेत्री,जिब्राईल शेख, सल्लागार- शंकरराव मोगरे, सेवानिवृत्त पोलिस उपनिरीक्षक, गडचिरोली यांचे हस्ते वाटप करण्यात आले.
गरजूंनी त्याचे आभार व्यक्त केल्याचे समजते.