कलावंताकरीता शासन व निवडून दिलेल्या खासदार – आमदार – नगरसेवकाचं काळीज का दुखत नाही ? भटक्या जमातीच्या कलावंताकरीता महामारीच्या उपासमारीत काहीज पॅकेज का नाही ?

135

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम : गेल्या वर्षभरापासून सातत्याने सुरु असलेली संचारबंदी, टाळेबंदी, जमावबंदी ! सर्व प्रकारच्या सार्वजनिक, सांस्कृतिक, नाट्य, लोककला, लग्नसमारंभ यावर आलेले कडक निर्बंध यामुळे, अठरा विश्वे दारिद्रयात जन्माला आलेला, अठरा पगाड जाती जमाती मधील, जन्मजात असलेला कलावंत मेटाकूटीला आलेला आहे . बेरोजगारी, वाढती महागाई व उपासमारीने, कर्जबाजारीपणाने तो बेजार झालेला आहे . आपली पिढयानपिढ्याची लोककला जसे की, मातंग समाजाची व्यक्ती लग्न कार्य समारंभात बॅन्ड पथक, ढोलताशे , सनई चौघडा वाजवून पोट भरतो . वासुदेव, गोंधळी, भराडी, वाघे मुरळी, लग्न समारंभात – ” गोंधळ जागरण ” करून उदरनिर्वाह करतात . गारूडी, मदारी, डोंबारी आपले खेळ दाखवून उदरभरण करतात . नंदीवाले, भाट, गावोगावी फिरून पालावर राहून जगतात.अशा या भटक्या लोकांना, गेल्या वर्षभरापासून सातत्याने, उपासमारीचा सामना करावा लागत आहे . परंतु शासनाला त्याचप्रमाणे मंत्री -संत्री, खासदार – आमदार यांना या भटक्यांचे दुःख कसे कळत नाही? ही सुद्धा माणसं आहेत हे यांना का कळत नाही ? आज पालावर राहणारे हे कलावंत अन्नानाला मौताद झाले आहेत . त्यातच संसर्गजन्य आजाराने त्यांची वयोवृद्ध आईवडील,मुलेबाळे घरातच तडफडत आहेत . निवडणूकीच्या वेळी यांच्या पालावर जाऊन, मतासाठी यांची पाय धरणारे नामवंत पुढारी यांना, आज कोरोना उपासमारीत जगविण्यात पालावरच्या या पडला आहे . तरी शासनाने सामाजिक न्याय विभाग, सांस्कृतिक विभागाकडून या पालावरच्या, पिढीजात भटकंती करणाऱ्या या परंपरागत जातिवंत कलावंताना त्वरीत आर्थिक मदत करावी . मंत्री, खासदार,आमदार, नगरसेवक यांनी , कोरोना महामारीत त्यांना जगविण्याकरीता पुढे याव . अन्न धान्य, औषधोपचाराचं सहकार्य करावं . व त्यांच्या पालनपोषण, उदरभरणाची जबाबदारी घ्यावी .अशी मागणी, विदर्भ लोक कलावंत संघटनेचे, संस्थापक अध्यक्ष, पत्रकार संजय कडोळे
कारंजा यांनी केली आहे .

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत