वैरागड येथे आज अस्वल आणि रानटी डुक्कर हल्ल्यात दोन जखमी.

724

 

प्रतिनिधी//प्रलय सहारे

वैरागड : – तेंदूपत्ता तोडणीसाठी गेलेल्या एक इसम आणि एक महिला यांच्यावर अचानक अस्वल आणि रानटी डुक्करांनी हल्ला केल्याने एक इसम गंभीर आणि महिला जखमी झाल्याची घटना आज सकाळी 07 वाजताच्या दरम्यान वैरागड पासून तीन कि.मी. अंतरावरील जंगलात घडली.
तेंदूपत्ता संकलन करण्यासाठी येथील बसस्थानक जवळील रहिवासी श्रीराम चेपा भोंडे (वय 55 वर्षे) हे आरमोरी रस्त्या जवळील पाच पांडव देवस्थान जंगल परिसरातील खळयातील डोंगरी गुफा पहाडी येथे पान तोडण्यास गेले असता अचानक एक मोठी अस्वल आणि तीचे सोबत दोन लहान बछडे यांनी हल्ला केला यात श्रीराम भोंडे यांच्या मांडी, गाल, हात, पोट आणि डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत वैरागड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वागधरे यांनी प्राथमिक उपचार करून त्यानंतर त्यांना आरमोरी उप जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.
त्याच दरम्यान त्याच वेळेस वैरागड येथील मरार वॉर्डात राहणारी वनिता अशोक बनकर (वय 35 वर्षे) हे सुद्धा त्याच परिसरात दुबणारा तलाव परिसर जंगलात तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेली असता रान डुकराने सोबत एक तीचा बछडा यांनी हल्ला केला यात वनिता बनकर यांना मांडी आणि पाठीमागे दुखापत झाली. त्यांच्यावर सुद्धा वैद्यकीय अधिकारी डॉ.वागधरे यांनी आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून घरी पाठविण्यात आले.
तेंदूपत्ता संकलन करून आपला उदरनिर्वाह करणारे शेतकरी गरीब मजूर वन्यजीव प्राणी मात्रणे अडचणीत सापडला आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे तेंदूपत्ता संकलन करणारे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने वन्य जिवापासून संरक्षण करून आर्थिक मदत देण्याची मागणी करीत आहे.
येथील वन सहाय्यक सोनूले योनी तत्काळ संपूर्ण घटनेची माहिती घेवून वरिष्ठ अधिकारी यांना दिली. तेंदूपत्ता संकलन करण्याऱ्या मजुरांनी सावधपणे आणि समूहानुसार तेंदूपत्ता तोडावे वन्य प्राण्याबद्दल माहिती मिळताच वानविभागास माहिती द्यावी असे आवाहन वैरागड येथील वन श्रेत्र सहायक सोनूले यांनी यावेळेस केले.