शासकीय माध्य.आश्रम शाळा गुड्डीगुडम येथिल 10 वी च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश, शाळेचा 100 टक्के निकाल

 

ग्रामीण प्रतिनिधी गुड्डीगुडम : रमेश बामनकर

गुड्डीगुडम :आदिवासी विकास विभाग अहेरी व्दारा संचालित शासकीय माध्य.आश्रम शाळा गुड्डीगुडम चे शैक्षणिक वर्ष 2019- 2020 मधील माध्यमिक शालान्त परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला.सर्व 29 पैकी 29 विध्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाळेतून 75 % च्या वर 05 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.प्रथम श्रेणीत 21 विद्यार्थी, द्वितीय श्रेणीत 03 विद्यार्थी, तर शाळेतून प्रथम क्रमांक आदित्य सुरेश येलम 82.20 % ,द्वितीय क्रमांक, कु.सुजाता वंगा वेलादी 76% , तृतीय क्रमांक आकाश लक्ष्मण येलम 75.60% टक्के तर प्रेम राजेंद्र शेडमाके याने 75.20% मिळवुन चौथा क्रमांक तर पाचव्या क्रमांकावर कु.बबिता मुसली आत्राम हिने 75 % पटकाविले व इतर विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले आहे.सर्व विद्यार्थ्यांनी यशाचे श्रेय आई, वडील, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले. मुख्याध्यापक श्री एम.ए.शिवणकर सर, सर्व शिक्षक श्री कु.एम.एच.कोलते, श्री आर.व्ही.गणपूरपू, श्री डब्ल्यू.एम.घोडाम, श्री एम.ए.खान, श्री एस.बी.पोटवार शिक्षक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी सर्व शिक्षकवृंदानी परीश्रम घेतले आहे.