डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूर व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आलापल्ली द्वारा श्रीराम हनुमान मंदिरात रक्तदान शिबिराचे आयोजन १२ रक्तदात्यांनी स्वेच्छेनी केले रस्क्तदान

52

 

रमेश बामनकर/अहेरी तालुका प्रतिनिधी

अहेरी: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखा आलापल्ली तथा डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूर द्वारा आलापल्ली येथील श्री राम, हनुमान मंदिरात आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात आलापल्लीतील रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले आहे.
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रकोप बघता ठीकठिकाणी रुग्णांना रक्त व प्लाझ्मा ची गरज भासत आहे. त्यामुळे सध्याच्या कठीण काळात युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान करून रक्ताची निकड पूर्ण करून राष्ट्रसेवेत हातभार लावावा असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व डॉ. हेडगेवार सेवा समिती चंद्रपूर तर्फे करण्यात येत आहे.
यावेळी रक्तदान शिबिरात अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील रक्तपेढी विभागाच्या सरिता वाघ, निखिल कोंडपर्ती व शरद बांबोळे, मेहराज शेख यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी रक्तदानापूर्वी इच्छुकांची अँटीजन कोविड टेस्ट करूनच रक्तदान करण्यात आले. यावेळी १२ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
यावेळी रक्तदान शिबिराला विभाग सहकार्यवाह जयप्रकाश शेंडे, जिल्हा कार्यवाह गजानन गादेवार, विहीप चे जिल्हा अध्यक्ष सीताराम सोनानिया, जिल्हा मंत्री अमित बेजलवार, भाजप अनुसूचित जमाती आघाडी चे प्रदेश सदस्य संदीप कोरेत आलापल्ली चे सरपंच शंकर मेश्राम यांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल उंचावले.
रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी सेवा प्रमुख श्रीनिवास गौतम, कार्यकरिणी सदस्य सुरेश गड्डमवार, तालुका कार्यवाह मंगेश परसावार, धर्मजागरण प्रमुख पूनम बुधावार, बळीराम मोहूर्ले, मोहन मदने, किशोर धकाते, नमन नागपूरवार सफल शेंडे, अभिजित शेंडे, अंकुश शेंडे, मिलिंद खोंड आदींनी विशेष परिश्रम घेतले.