कोरोना काळात ते देत आहेत मोफत बुस्टर डोस यशवंत पेंढाम्बकर यांच्या कोरोना काढ्याची सर्वत्र चर्चा

81

 

प्रतिनिधी : ओंकार रेळेकर.

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील कामथे नं २ जिल्हापरिषद शाळेतील शिक्षक यशवंत चंद्रकांत पेंढाबकर गुरुजी यांनी कोरोना संकट काळात समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.कोरोना काळात मानवी शरीराला अत्यंत गुणकारी असणारा बुस्टर डोस आयुर्वेदिक चहाचा काढा ते दिवसभर चिपळूण शहरात त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मोफत देत आहेत.
आलं,लवंग,काळीमिरी,दालचिनी आयुर्वेदिक चहापावडर,साखर इत्यादी मिश्रण पंधरा मिनिटं गॅस वर उकळवून त्याचा आयुर्वेदिक काढा सकाळ संध्याकाळ आपल्या घरी बनवून पेंढाबर गुरुजी आपल्य टूव्हीलर वर सोबत घेतात रस्त्यात जे जे कोणी ओळखीचे,अनोळखीचे भेटेल त्यांना चहा घेता का असे आदरपूर्वक विचारून एक कप चहा अगदी मोफत ते प्रत्येकाला देतात दिवसभारातून दोन ते तीन वेळा ते घरी चहा बनवतात यातून सुमारे ४० ते ५० कप चहाचे दिवसभर वाटप होते,जनसेवा हीच ईश्वर सेवा असे मानून पेंढाबर गुरुजी हे सामाजिक कार्य मागील लॉकडाऊन पासून करीत आहेत.चिंचनाका येथे सेवेत असणारे पोलीस, होमगार्ड यांच्यासह बाजारपेठ,बस स्टँड परिसर,पागनाका ,देसाई बाजार,ईत्यादी ठिकाणी ते चहाचे वाटप करता तसेच लोकप्रतिनिधी ना ही चहाचे वाटप होते,एक उत्कृष्ट बुष्टर डोस म्हणून चहाचा आस्वाद घेणारे अनेकजण सांगतात,कोविड काळात विविध ठिकाणी सर्व शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे यात शिक्षकवर्गाचेही मोठे योगदान आहे,आरोग्य मित्र म्ह्णूनही पेंढाबकर यांनी चांगले काम केले आहे.पेंढाबर गुरुजी गेली २८ वर्ष शिक्षण क्षेत्रात सेवेत आहेत,उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना अनेवेळा सन्मानित करण्यात आले आहे,शितल राजे फाउंडेशन,चिपळूण ग्लॅलक्सि,कास्ट्रबाईड शिक्षक संघटना ईत्यादी संस्थांकडून आरोग्य मित्र,कोविड योद्धा म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.चहाचा आयुर्वेदिक काढा शक्य होईल त्या त्या ठिकाणी मोफत वाटायचा ही संकल्पना पेंढाबकर यांच्या सौभाग्यवती राज्य शिक्षक पुरस्कार प्राप्त तेजल यशवंत पेंढाबकर यांनी त्यांना सुचविली पेंढाबकर यांच्या सामाजिक कार्यात त्यांना पत्नीचा नेहमी मदतीचा हात असतो.
यशवंत पेंढाबकर यांचे कार्य कौतुकास्पद : राजू जाधव
आमचे मित्र यशवंत पेढाबकर यांचे सामजिक कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे,मागील वर्षीपासून त्यांचे कोविड योद्धा म्हणून काम आम्ही जवळून पाहत आहोत सध्याच्या काळात माणसाच्या शरीरातील ईम्युनिटी पॉवर चांगली होणे गरजेचे आहे अशा काळात आयुर्वेदिक चहाचा काढा ठीक ठिकाणी मोफत वाटण्याचा पेंढाबर यांचा उपक्रम कौतुकास्पद आहे अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते राजू जाधव यांनी व्यक्त केली,या वेळी चहाचा आस्वाद घेण्यासाठी राजू जाधव,भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते संजय जोशी,राकेश कोलगे आदी उपस्थित होते.
फोटो : आयुर्वेदिक चहाचा काढा चे वाटप करतांना पेंढाबकर गुरुजी,राजू जाधव,संजय जोशी,राकेश कोलगे छायाचित्रात दिसत आहेत.

*दखल न्यूज भारत*