अश्लिल भाषेत शिविगाळ करुन जिवे मारन्याची धमकी दिल्याबाबत तक्रार

154

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम कारंजा येथील रहिवाशी असलेल्या नगरपरिषदेचे बांधकाम सभापती चाॅंदशहा कासमशहा यांना येथील जावेद अ.वहाब चाऊस यांनी घरी येवुन अश्लिल भाषेत शिविगाळ करत जिवे मारन्याची धमकी देवुन खोट्या गुन्ह्यात अडकवन्याची धमकी दिल्याची तक्रार कारंजा पोलिस स्टेशनला दिली असुन या तक्रारीची चौकशी करुन पुढील कारवाई करणार असल्याचे पोलीसांनी सांगीतले आहे.

जनतेमधुन निवडुन गेलेले सध्या कारंजा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती चाॅदशहा कासमशहा यांना दि.६ मे रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास नगरपरिषदेचे शिपाई जावेद अ.वहाब चाऊस यांनी चाॅदशहा यांचे घरी जावुन अश्लिल भाषेत शिविगाळ करत ‘तुझा नवरा चाॅद कुठे आहे’अशी बायकोलाही आरेकारीची भाषा वापरत धमकी दिली.चाॅदशहा घराबाहेर आल्यानंतर त्यांनाही अश्लील भाषा वापरत जिवे मारन्याची धमकी दिली आणी माझ्या घरी अनाज घेन्यासाठी कोणत्या बायांना पाठवतोस ते पाठव आणी त्यांचेसोबत तु पण ये,तुझे पायच तोडतो.अशी धमकी दिली.अशा तक्रारीचे निवेदन कारंजा पोलिसस्टेशनला दिले असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत