ब्रेकिंग न्युज, भरधाव आयव्हाने घेतला दुचाकीस्वाराचा जिव, १८ नंबर पुलीयाजवळ भिषण अपघात

211

 

वणी : परशुराम पोटे

वणी-मुकुटबन मार्गावरील १८ नंबर पुलाजवळ एका भरधाव जाणाऱ्या आयव्हाने एका दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ वाजताचे सुमारास घडली आहे.
आज दि.८ मे रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान आयव्हा क्र.एमएच-४० बिजी ६५५१ हा कायर कडुन वणीकडे भरधाव वेगाने येत होता तर दुचाकीस्वार वणीकडुन कायर मार्गै जात असतांना पैटुर जवळ असलेल्या १८ नंबर पुलाजवळील टर्निंगवर भरधाव आयव्हाने दुचाकीला जोरदारपणे धडक दिली या अपघातात दुचाकीस्वाराला गंभीर मार लागल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, त्या दुचाकीस्वाराजवळ एक पासपोर्ट आढळुन आला असुन त्यात विजय चंदनखेडे असे नाव नमुद असुन पांढरकवडा येथील रहिवासी असल्याचे दिसून येत आहे. तर मोबाईल नंबर ८९९९६६९६९१ असे नमुद आहे. विशेष म्हणजे आयव्हा क्र.एमएच-४० बिजी ६५५१ हा येवढा भरधाव वेगाने येत होता की,त्याने दुचाकीला धडक देऊन १८ नंबर रेल्वे पुलावर सुमारे २० फुट उंच जाऊन खाली आला. तुर्तास पोलिस घटनास्थळी दाखल झाले असुन पंचनामा केला जात आहे.