कोरोनाबाधित रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना मैदानात…… चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाला करणार 100 ऑक्सिजन सिलेंडर ची मदत आज 25 ऑक्सिजन सिलेंडरची मदत

111

 

उपसंपादक अशोक खंडारे/प्रतिनिधी प्रविण तिवाडे

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना बधितांचा वाढता आकडा बघता इथल्या आरोग्य व्यवस्थेच्या मदतीसाठी शिवसेना मैदानात उतरली असून ना.पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनात माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल यांच्या पुढाकाराने आज चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाला 25 सिलेंडर देण्यात आले.पुन्हा 100 सिलेंडर देणार असल्याचे यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेन्द्रसिंह चंदेल यांनी सांगितले.

जिल्ह्यतील कोरोनाबधित रुग्णांच्या मदतीसाठी शिवसेना सदैव तत्पर असून आवश्यक पडेल ती मदत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज जिल्ह्यतील जनता संकटात सापडली असताना सुरेन्द्र भाऊ च्या नेतृत्वात व पुढाकाराने कुरखेडा, वडसा, आरमोरी, गडचिरोली, चामोर्शी,या तालुक्यात ऑक्सिजन सिलेंडर ची मदत करण्यात आली.80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण अशी शिकवण स्व.बाळासाहेबांनी दिली.आज तळागाळात काम करणाऱ्या शिवसैनिकांनी ते अमलात आणण्याचे कार्य आज जोमाने करीत आहे.

चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाला आज 25 ऑक्सिजन सिलेंडरची पहिली खेपेची मदत देण्यात आली.यावेळी शिवसेना माजी जिल्हाप्रमुख सुरेन्द्र सिह चंदेल, चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक,माजी महिला आघाडी जिल्हाप्रमुख छायाताई कुंभारे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे, माजी सभापती अविनाश गेडाम, तालुका प्रमुख पप्पी पठाण, प्रणय मंडल व व रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.