ऑफलाइन पिक विमा भरण्यासाठी बॅंकेकडून नागरिकांना केराची टोपली…(मुखेड तालुक्यातील बैका अव्वल)

297

 

जिल्हा प्रतिनिधी नांदेड
राजेश बालाजीराव नाईक
दखल न्यूज// दखल न्यूज भारत

नांदेड :- 30 दिवसांपासून CSC आपले सरकार सेवा केंद्र तर्फे पिक विमा भरला जात आहे.
मात्र गेली दोन दिवसांपासून तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटानकर साहेबांनी काल दि 30 रोजी पिक विमा हा Offline भरुन घेण्यासाठी सर्व संबंधित बैकांना काल पत्र काढले असून त्याची अंमलबजावणी मात्र होताना दिसून येत नाही. यामध्ये मुखेड येथील काही बैकांना जसे की तालुक्यातील सर्व NDCC BANK, BOB BANK, Gramin Bank कुठल्याही प्रकारची Offline विमा भरण्यासाठी सेवा सुरु केलेली नाही Central Bank Mukhed च्या शाखा व्यवस्थापकांना भेट दिली आसता आमची सेवा सुरु आहे आसे सांगितले व बाकी बैकांशी दखल न्यूज प्रतिनिधी यांनी विचारणा केली असता उडवा उडविली ची उत्तरे दिली गेली आहेत. यासाठी क्रषी विभागाशी संपर्क केला असता नंबर नॉट रिचेबल येत आहेत. व संबंधित बैकेंवर कार्यवाही करण्याची मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे.
तरी याची तातडीने दखल घेण्याची आत्यंत आवश्यकता आहे.