आजारा ला कंटाळून भुमिहीन महीलेने संपवीली जीवनयात्रा

388

 

वाशिम प्रतिनिधी/आशिष धोंगडे

वाशिम:- उंबर्डा बाजार येथील घटना
येथील एका साठ वर्षीय भुमिहीन महीलेने आजाराला कंटाळून झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपविल्याची घटना दि.७ मे रोजी साडेअकरा वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
सविस्तर असे की ग्राम उंबर्डा बाजार येथील माळीपुरा भागात एकटीच राहणारी श्रीमती उषाबाई आनंदराव शिनगारे वय ६० हिने आजाराला कंटाळून गावा लगतच्या अशोक ढोरे यांचे शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवीली .ती सकाळी ९ वाजता पासुन घरून निघुन गेली होती .
या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलिस स्टेशन चे ठाणेदार गजानन धंदर यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एस.आय. पटेल मॅडम , ऐ.एस. आय. धनराज पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली तर घटनास्थळाचा पंचनामा चौकी जमादार कैलास गवई यांनी करून कारंजा ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी आकस्मीक मृत्यू ची नोंद घेतली आहे .

आशिष धोंगडे
वाशिम प्रतिनिधी
दखल न्युज भारत