……तर आरोग्य केंद्र बंद पाडू-कोकर्ड्याची तरुणाई चिडली ऑनलाईन लसीकरण पध्दत ग्रामीण भागासाठी सदोष स्थानिक ग्रामस्थांना प्राधान्य नसून बाहेरगाव च्या लोकांचेच लसीकरण

47

अमरावती(जिल्हा प्रतिनिधी, युवराज डोंगरे)

दि 7 मे ला 18 ते 44 वयोगटातील 100 कोरोना लसीचे ऑनलाईन प्रयोजन होते मात्र बाहेरगाव वरून जे ऑनलाईन नोंदणी झाले सर्व मंडळी लस घेऊन निघून गेले आणि स्थानिक तरुण मात्र पाहतच राहिला ,अचलपूर पथ्रोत वर्धा अंजनगाव येथील व्यक्तींनी याचा लाभ घेतला त्यांची संख्या 70 एवढी होती
याबाबतीत स्थानिक तरुण वर्ग खूप चिडला असून सदरची ऑनलाईन पध्दत ही सदोष असल्याचे त्यांनी म्हटले आहे कारण कोकार्डा परिसरात प्राथमिक आरोग्य केन्द्र असून त्यातील एकाही व्यक्तिला लसीकरण झाले नाही,या पद्धतीमध्ये लवकर सुधारणा करावी,किंवा 50 टक्के ऑनलाईन आणि 50 टक्के खुल्या पद्धतीने नियोजन करावे याबाबतीत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर त्वरित निर्णय घेण्यात यावा
अन्यथा आरोग्य केंद्र बंद पाडू असा निर्वाणीचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला
स्थानिक ग्रामस्थांना प्रथम प्राधान्य दयावे असेही ते म्हणाले
आरोग्य अँप डाऊनलोड करून त्यावर नोंदणी करून ते पाहणे आणि इतरांना सांगणे हे जिकरीचे काम आहे अजूनही ग्रामिनामध्ये स्मार्टफोन चा सर्वसामान्य उपयोग झाला नसून त्यामुळे ही प्रकिया जटिल वाटते,7 मे ला 18 ते 44 वयोगटातील हा पाहिलाच डोज होता मात्र स्थानिकांच्या हक्काचा पहिला डोज ऑनलाईन प्रकियेमुळे बाहेरगावचे श्रीमंत लोकं घेऊन गेले त्यामुळे कोकरड्यातील तरुणवर्ग चिडला आहे अशीच जर प्रकिया असली तर आम्ही डोज घ्यायचा तर कधी? असा प्रश्न यावेळी त्यांनी केला आहे
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राला समस्या मांडताना सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पिंजरकर,शिवसेना तालुका उपप्रमुख निवृत्ती बारब्दे, शेषराव गव्हाळे ,उमेश टोलमारे, पंकज पिंजरकर, वैभव मिसाळ आणि उद्धव बारब्दे सहित अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

“” सदरच्या ऑनलाईन लसीकरण पद्धतीमध्ये आम्ही काहीही फेरबदल करू शकत नाही,ज्या पद्धतीने आम्हास आदेश आहे त्याची अंमलबजावणी करावी लागते,आज 100 लसीचे लक्ष होते मात्र ते ऑनलाईन वाल्या साठीच होते त्यामुळे आम्ही खुल्या पद्धतीने ते ग्रामस्थांना देऊ शकलो नाही
ज्यांनी ऑनलाईन केले त्यांनाच आम्ही लसीकरण केले मग ते कुठलेही असले तरी
डॉ खोरगडे
प्रा आ केंद्र, कोकर्डा