Home चंद्रपूर  गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

183

 

ऋषी सहारे
कार्यकारी संपादक /
अश्विन बोदेले
प्रतिनिधी
दखल न्यूज भारत

आरमोरी:-दि 31 जुलै- आरमोरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय तथा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय येथे दिनांक 30/ 7/ 2020 रोज गुरुवारला गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
मार्च 2020 च्या परीक्षेला एकूण 163 विद्यार्थी प्रविष्ट झालेत. त्यापैकी 156 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.प्राविण्य श्रेणी ते 40 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 62 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 45 तसेच पास श्रेणीत 9 विद्यार्थी उत्तीर्ण झाले यात गुणानुक्रमे कुमारी मिथाली कैलास गेडाम ही 96 टक्के गुण घेऊन प्रथम आणि द्वितीय रोहित वासुदेव निखारे 95.20% व तृतीय कुमारी तनवी प्रकाश ठाकरे हिला 94.40% प्राप्त झाले कुमारी वेदांती भास्कर बोडणे 94.20% अमन अजय गजभिये 94% कुमारी क्रांती प्रभाकर अंबोरकर 93.80 टक्के सोयल भीमराव मेश्राम 93.20 टक्के कुमारी कृष्णाई रामचंद्र गेडाम 92.60 टक्के कुमारी ऐश्वर्या चेतराम म्हस्के 90 टक्के गुण घेऊन सुयश प्राप्त केले.
संस्थेच्या वतीने एच एस सी व एस एस सी प्रथम व द्वितीय आलेल्या विद्यार्थ्यांचे रोख पारितोषिक व पुष्पगुच्छ देऊन संस्था व प्राचार्य तसेच विषय शिक्षक यांच्याकडून व इतर सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे पदाधिकारी सौविमलताई मदनजी मेश्राम प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष तथा माजी प्राचार्य माननीय पी के सहारे प्राचार्य व्ही जी शेंडे पर्यवेक्षक एस के वासनिक हंसराज बडोले कुमारी एम. डी. गेडाम के व्ही बांबोडे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते अध्यक्षीय भाषणात माननीय मेश्राम मॅडम यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये उत्तरोत्तर प्रगती करत राहून आपला व आपल्या शाळेचे नाव लवकिक करावे व देशाचासुजाण नागरिक बनून राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावावा असा मौलिक संदेश दिला प्रमुख पाहुण्यांचे समुचित भाषणे झालीत संस्था अध्यक्ष माननीय श्री मदनजी मेश्राम तसेच संस्थेचे सचिव एडवोकेट प्रशांत जी मेश्राम यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या
या सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचे संचालन एस के वासनिक सर प्रास्ताविक प्राचार्य व्ही जी शेन्डे सर तर आभार प्रदर्शन कुमारी एम डी गेडाम मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाला सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांची उपस्थिती होती

Previous articleसमुदाय आरोग्य कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्रांना दिले निवेदन
Next articleऑफलाइन पिक विमा भरण्यासाठी बॅंकेकडून नागरिकांना केराची टोपली…(मुखेड तालुक्यातील बैका अव्वल)