वणी शहरातील सहा प्रतिष्ठाणे शिल , नगर पालीका व पोलिस प्रशासनाची संयुक्त करवाई

46

 

वणी : परशुराम पोटे

संपूर्ण देशासह महाराष्ट्रात कोरोना महामारीचा प्रकोप मोठ्या प्रमाणात वाढलेला असल्यामूळे आरोग्य यंत्रणावर मोठा ताण आलेला आहे, कोरोना बाबत लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले असले तरी अद्यापही काही लोक मात्र याला गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत असल्याने कोरोना संक्रमाची साखळी तोडण्या करिता शेवटी शासनाने याबाबत गंभीर पाहूले उचलून सदर नगर पालीका व महसूल विभाग, पोलीस प्रशासनाच्या वतीने
शहरातील व्यापार्‍यांचे प्रतिष्ठानांवर निर्बंध असतांना देखील नियम तोडणार्‍या सहा व्यापारी प्रतिष्ठानावर नगर पालीका व महसूल विभाग, पोलीस प्रशासनाच्या सयूक्तपणे कारवाईत शहरातील सहा प्रतिष्ठाणे शिल करण्यात आले तक्ष तीन व्यवसायिकावर ६ हजार रूपयाची दंडाची कारवाई करण्यात आली.
संचारबंदी आणि कठोर निर्बंध लादूनही शहरातील गर्दी कमी होत नसल्याचे नाव घेत नाही, विशेष म्हणजे ११ वाजल्यानंतर सर्व बाजार पेठ बंद होत असतांनाच अनावश्यक बाहेर निघनार्‍या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, त्यात आज दि.७ मे रोजी छूप्या पद्धतीने सूरू असलेल्या ६ व्यवसायिकांचे प्रतिष्ठाणे शिल करण्यात आले, विशेष म्हणजे ते सहाही प्रतिष्ठाणे दि,१५ मे पर्यंत बंद ठेवण्याची कार्यवाही सूद्धा करण्यात आली आहे, आणी तिन व्यवसायिकावर ६ हजाराचा दंड ठोकण्यात आला. सदरची कार्यवाही प्र,मूख्याधिकारी महेश रामगूंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक करअधिक्षक खूशाल भोंगळे, सहायक प्रशासकिय अधिकारी विजय महाकूलकार न.प.वणी, नावेद सर, विजय चव्हाण शिक्षक,पोलीस अधिकारी यांनी केली तसेच यापूढेही कोविड-१९ चे उल्लंघन केल्यास कार्यवाहीचे सत्र शहरात सुरूच राहतील असेही यावेळी सांगण्यात आले.