प्रा.आ.कें. मालेवाडा येथे जनजागरण

192

छन्ना खोब्रागडे प्रतिनिधी
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने देशातील जनसामान्यांना हैराण करून सोडले आहे. यात ग्रामीण भाग सुद्धा सुटलेला नाही. यावर लस सुद्धा उपलब्ध झालेली असून संपूर्ण देशात लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र देशातील ग्रामीण भागात लसीकरणाला पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद न मिळत असल्याचे आढळून आले आहे.यासाठी आरोग्य विभागाने वेळोवेळी जनजागरण शिबीर आयोजित करून शक्य तेवढ्या प्रमाणात जनजागरण करणे सुरू केले आहे.
याच पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्र मालेवाडा येथे दिनांक 6 मे 2021 ला जनजागरण शिबीर आयोजित करण्यात आले होते. यात कुरखेडा येथून संवर्ग विकास अधिकारी तेलंग मॅडम ह्या विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी उपस्थित असलेल्या नागरिकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन केले. ह्या कार्यक्रमाला श्रीमती गीताताई कुमरे जि. प. सदस्या , अनुसयाताई पेंदाम सरपंच ग्रा.पं. मालेवाडा ,कुकडे साहेब बाल विकास प्रकल्प अधिकारी कुरखेडा, शिवणकर सर गट शिक्षण अधिकारी कुरखेडा, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रमोद उंदीरवाडे, डॉ.टेकाम, श्री. कोरे आरोग्य कर्मचारी इत्यादी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी कोवीड लसीकरण, तपासणी व आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना यावर विस्तृत मार्गदर्शन केले. मालेवाडा परिसरातील जवळपास 40 ते 50 नागरिक या शिबिराला उपस्थित होते. सर्व उपस्थितांनी वैयक्तिक अंतर राखून कार्यक्रमाला उत्तम साथ दिली.