कादवडमधील मुस्लिम समाजातील दोन गटातील वाद चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचने मिटविला तालुक्यातुन मंचाचे होतंय कोतुक लवकरच एक गाव दत्तक घेणार : अन्वर पेचकर

69

 

प्रतिनिधी : (ओंकार रेळेकर)

चिपळूण : गेल्या आठवड्यात कादवड येथे नमाज झाल्यानंतर दोन गटात मारामारी होऊन शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता याविषयी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांनी दोन्ही गटाची संयुक्त बेठक घेऊन समझोता केला करून सदरचे प्रकरण कायम स्वरूपी मिटविले त्याबद्दल दोन्ही गटाने व कादवड जमातीने चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचचे आभार मानले .तर तालुक्यातुन मंचाचे कोतुक होत आहे .
चिपळूण तालुक्यातील कादवड येथील यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले या दोन गटात नमाज पडल्यानंतर बाचाबाची होऊन हाणामारी झाली होती याविषयी शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे मात्र चिपळूण तालुक्यात मुस्लिम समाजात प्रथमच अशी घटना घडली त्यामुळे अनेकांनी खेद व्यक्त केला याविषयी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांनी कादवड मध्ये यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले दोन्ही गटाची संयुक्त बेठक घेतली यावेळी अद्यक्ष अन्वर पेचकर, उपाध्यक्ष सदरुदिन पटेल,प्रवक्ते निसार शेख व शकील परकार उपस्थित होते यावेळी चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांनी दोन्ही गटाची भूमिका जाणून घेऊन समझोता केला त्याचबरोबर यासिन चोघुले व अल्लाउद्दीन चोघुले यांचे मनोमिलन केले यावेळी कादवड जमातीने मंचाचे आभार मानले यावेळी अद्यक्ष अन्वर पेचकर म्हणाले की मुस्लिम समाजात अशा प्रकारे वाद होणे चुकीचे आहे यापुढे असे वाद होऊ नये याकडे सर्वांनी लक्ष द्यावे तसेच लवकरच एक गाव मंच दत्तक घेणार असल्याची घोषणा केली
मंचाने कादवडमध्ये जाऊन दोन्ही गटाची संयुक्त बेठक घेऊन वाद मिटविल्याबद्दल तालुक्यातील अनेकांकडून अभिनंदन होत आहे .

दखल न्यूज भारत