समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यावर उपासमारीची पाळी तालुका आरोग्य अधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्री व आरोग्यमंत्रांना दिले निवेदन

 

सावली ..सुधाकर दुधे
सावली तालुक्यातील मागील दीड वर्षापासून जिल्हा क्षयरोय नियंत्रण अंतर्गत आशाकल्प NGO टी. बी. निर्मूलनाचे काम करत होती. या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रावर NGO मार्फत समुदाय आरोग्य कर्मचारी(CHW) यांची करार तत्वावर नेमणूक करण्यात आली होती. यामुळे तालुक्याचे क्षयरोग रुग्ण शोधमोहिम झपाट्याने होत होती. मागील दिड वर्षापासून शोधमोहिमेचे कार्य उत्तमरित्या चालू होते. यामुळे जिल्हाचा व तालुक्याचा शोधमोहीम दर उत्तम पद्धतीने वाढलेला होता.
या NGO मार्फत कार्य करीत असलेल्या समुदाय आरोग्य कर्मचारी(CHW) मानधनावर काम करीत होते. यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळत होता परंतु शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे या कंत्राटी कामगारांना 1 ऑगस्ट पासून कामावरून काढून टाकण्यात येत आहे. त्यामुळे समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यावर बेरोजगारी व उपासमारीची पाळी आली आहे.
समुदाय आरोग्य कर्मचाऱ्यांना पूर्ववत कामावर घेण्यात यावे यासाठी तालुका आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले.